मंकीपॉक्सची भीती! महाराष्ट्रात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी | Monkeypox Advisory in Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkeypox Virus News Updates

मंकीपॉक्सची भीती! महाराष्ट्रात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

मुंबई : एकीकडे देशासह राज्यात कोरोना विषाणूचा धोका कमी होत असताना आता पुन्हा नव्या विषाणूनी डोकं वर कढण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील देशांमध्ये वाढत्या मंकीपॉक्सच्या (Monekypox) रूग्णांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारने संभव्या धोके लक्षात घेत सुरक्षेच्या कारणास्तव मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्य सरकार पाठोपाठ मुंबई महापालिकेनेदेखील काही मार्गदर्शन तत्वे जारी करत नागरिकांना घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Issue Monekypox Advisory)

हेही वाचा: ...तर अमेरिकन सैन्य चीन विरोधात उभे राहणार; बायडेन यांचे मोठे विधान

आरोग्य विभागाची मंकीपॉक्स संदर्भात मार्गदर्शक तत्वे

  • मंकीपॉक्सचा प्रसार झालेल्या देशांमध्ये गेल्या 21 दिवसांत प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवणे. तसेच संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.

  • एखाद्या नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल असे यात सांगण्यात आले आहे.

  • रक्त, थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने NIV पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.

  • गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.

  • जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही, असे यात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: 'मंकीपॉक्स' महामारीचं स्वरुप धारण करेल का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात?

मुंबई महापालिकेचीही सावध पावलं

दरम्यान, मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागापाठोपाठ मुंबई महापालिकेनेदेखील (BMC) सावध पाउलं उचलण्यास सुरुवात केली असून, आजपर्यंत (23 मे 2022) मुंबईत कोणतीही संशयित किंवा मंकीपॉक्सची लागण झालेल्या रूग्णाची पुष्टी झालेली नाही. मात्र, विमानतळ अधिकाऱ्यांकडून मंकीपॉक्सचा प्रसार झालेल्या देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांची योग्य ती तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला असून, येथे 28 बेड तयार ठेवण्यात आले आहे. तसेच संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: पाकिस्तानी ISI चा भारतातील रेल्वे ट्रॅक उडविण्याचा कट, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

मंकीपॉक्स: वाढत्या रूग्णसंख्येनंतर केंद्राचे महत्त्वाचे आदेश

काही देशांमध्ये मंकीपॉक्सच्या वाढत्या रूग्णसंख्यमुळे चिंतेत भर पडलेली असताना आता केंद्र सरकारनेदेखील कडक पाउलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि ICMR ला परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मंकीपॉक्सग्रस्त देशांमध्ये प्रवासाचा इतिहास असलेल्या आणि या आजारीची लक्षणे असणाऱ्या प्रवाशांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra Health Department Issued Advisory On Monekypox

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top