राज्यात 1583 रुग्णांना जलजन्य आजारांची लागण; जाणून घ्या सविस्तर

 infectious disease
infectious diseasesakal media

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (corona infection) एकीकडे कमी होत असताना ओमिक्रॉनचे संकट (omicron variant) कायम आहे. त्यातच आता राज्यात साथीच्या आजारांसह (infectious diseases) जलजन्य आजारांचे प्रमाणही वाढले असून 1, 583 रुग्णांना जलजन्य आजारांची लागण (contaminated water diseases) झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे यातून होणारे मृत्यू मात्र नियंत्रणात (Deaths in control) आहेत.

 infectious disease
राज्यात दिवसभरात 825 नव्या रुग्णांची भर; 14 जणांचा मृत्यू

पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्यायलं जातं. त्यामुळे आजारांना सामोरं जावं लागतं. त्यातुन जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. यालाच जलजन्य आजार असे म्हटले जाते. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 2021 मध्ये जलजन्य आजारांमध्ये सर्वाधिक रुग्ण अतिसाराचे आढळले आहेत. 2021 जानेवारी ते 20 डिसेंबरपर्यंत 953 रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले असून आतापर्यंत 444 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 176 काॅलराचे रुग्ण तर, कावीळचे 10 रुग्ण नोंदले गेले आहेत. असे एकूण 1,583 जलजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, विषमज्वर या आजाराच्या एकाही रुग्णाची नोंद राज्यात करण्यात आलेली नाही असे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. राज्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जलजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले दिसत असले तरी मृत्यूंचे प्रमाण शून्य आहे, त्यामुळे, ही दिलासादायक बाब आहे. 

 infectious disease
हॉटेलांचा GST भरण्याचे काम सोपवले ऑनलाईन अॅपवर; ग्राहकांना फोडणी

राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये जलजन्य आजारांच्या 1,174 रुग्णांची नोंद झाली होती. यात 1063 अतिसाराचे, गॅस्ट्रोचे 104,  आणि काविळीच्या 7 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 2019 मध्ये एकूण 1,510 रुग्ण आढळले होते तर  त्याआधी 2018 मध्ये 2289 जलजन्य आजारांचे रुग्ण आणि एकूण 13 मृत्यू नोंदले गेले होते.

उपचार काय कराल ?

पाणी पिताना शुद्ध करून पिणं हा सर्वोत्तम उपाय. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करता येऊ शकतो. पाणी उकळून प्यावं. मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावं. त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं. बाहेरचं खाणं टाळावं. पाणीपुरी, भेळ किंवा इतर पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यावेळी मीठ- साखर पाणी सतत पित राहावं. त्यामुळे शरीराला आराम मिळू शकतो. ओआरएस पावडर मिळते. ती एक लीटर पाण्यात टाकून प्यावी. टेट्रा पॅक्स देखील उपलब्ध आहेत ते प्यावं. नारळाचं पाणी घ्यावं. मात्र ग्लुकॉन डी अथवा कोल्ड ड्रींक्स घेणं या दिवसात टाळावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com