

Scorching heatwave conditions in Vidarbha as Amravati records the highest temperature in India while the weather department warns of rising heat and possible unseasonal rain across Maharashtra.
esakal
राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, विदर्भातील अमरावती शहरात आज कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सियस नोंदवले आहे. हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले असून, अमरावतीत सरासरीपेक्षा तब्बल ६.८ अंशांनी अधिक तापमान वाढ झाली झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भातील अनेक शहरांमध्ये उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे.तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.