Scorching heat grips Maharashtra as temperatures rise sharply across Vidarbha, Marathwada, Mumbai and Konkan regions amid IMD heatwave alert.

Scorching heat grips Maharashtra as temperatures rise sharply across Vidarbha, Marathwada, Mumbai and Konkan regions amid IMD heatwave alert.

esakal

Maharashtra Weather Update : होळीआधीच उन्हाचा तडाखा वाढला, राज्यातील 'या' भागांत उष्णतेची लाट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ?

Maharashtra Heatwave : उत्तर भारतातील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यभर तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागांत कमाल तापमान ३८–३९ अंश सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Published on

महाराष्ट्रात हिवाळा पूर्णपणे संपुष्टात आल्याची चाहूल लागली आहे पण होळीचा सण येण्यापूर्वीच राज्यात कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने तापमानात झपाट्याने वाढ होत असून, आज (१८ फेब्रुवारी) राज्याच्या बहुतांश भागांत कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांचा प्रभाव राहणार आहे, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यातील आकाश प्रामुख्याने निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील.पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने नागरिकांना दिवसभर उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. उत्तर भारतातील थंड वाऱ्यांचा जोर ओसरल्याने राज्यात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com