Heatwave Alert : महाराष्ट्रात उन्हामुळे अलर्ट! कामगारांना दुपारी १२ ते ४ या वेळेत सक्तीची विश्रांती; शासनाची SOP काय?

Maharashtra mandates afternoon work break as heatwave intensifies across regions : महाराष्ट्रात उष्णतेचा वाढता तडाखा लक्षात घेऊन कामगारांसाठी दुपारी १२ ते ४ सक्तीची विश्रांती लागू; शासनाच्या SOP मधील महत्त्वाचे नियम जाणून घ्या
Maharashtra Enforces 12–4 PM Work Break Amid Heatwave

Maharashtra Enforces 12–4 PM Work Break Amid Heatwave

esakal

Updated on

महाराष्ट्रात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना राज्य सरकारने असंघटित क्षेत्रातील बाहेर काम करणाऱ्या कामगारांना उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तीन विशेष स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स (SOP) जाहीर केल्या. यात मुख्यतः रस्त्यावरील कामगारांसाठी अनिवार्य विश्रांती आणि कामाच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना आहेत. महाराष्ट्र हा देशातील १० सर्वाधिक उष्णता-संवेदनशील राज्यांपैकी एक आहे. IMD च्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. अकोला, अमरावती, परभणी, मालेगावसारख्या ठिकाणी तापमान ४०-४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com