
राज्यात मागील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढला कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात मुसळधार पाऊस सुरु असून आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने रायगड, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह कोकणात अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.