
महाराष्ट्रात यंदा मॉन्सूनने 12 दिवस आधीच दमदार एन्ट्री केली आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे मॉन्सूनचे वारे वेगाने पुढे सरकले असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. मात्र, पुण्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने आता काहीशी विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील.