
राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलीय. कोकण व घाटमाथ्याच्या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अजूनही हजेरी न लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिलाय. तर मराठवाडा, विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.