
नवनाथ भेके
निरगुडसर : सध्या शहरी व ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाची कोसळधार सुरू असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात वीजसुरक्षेबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. पाणी हे विजेचे चांगले वाहक आहे. त्यामुळे प्रामुख्याने रस्त्यावरील सार्वजनिक वीजयंत्रणा,पथदिव्यांच्या लोखंडी खांबापासून आणि घरगुती वीज उपकरणांपासून विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.