
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गा या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट , कोल्हापूर सातारा नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.