
Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून आज 7 जुलै रोजी देखील राज्यातील सर्वच भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे आहेत.