

Heavy rainfall lashes Mumbai and surrounding districts
esakal
महाराष्ट्राच्या अनेक भागांत मान्सूनचा जोर वाढला असून, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने (IMD) पालघर आणि रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, पुढील २४ तासांत अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.