
Head Constable: वाढते नागरीकरण आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा अपुरी पडत असल्याने पोलिस खात्यात भरती करण्याची मागणी गृहखात्याकडे केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पोलिस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार गृह विभागाने दिले आहेत.