
Tiranga Yatra: पाकिस्तानविरोधात भारत सरकारनं ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवलं. यानंतर आता आपल्या सैनिकांचा पराक्रमाचा गौरव करण्यासाठी भाजपकडून देशभरात 'तिरंगा यात्रे'चं आयोजन करण्यात आलं आहे. भारताचा तिरंगा अर्थात राष्ट्रध्वज घेऊन मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नेते सहभागी होत आहेत.
याच यात्रेदरम्यान एका भाजप आमदारानं चक्क तिरंग्यानंच आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळं आता सोशल मीडिया युजर्स चांगलेच संतापले आहेत. तसंच काँग्रेसनं देखील भाजप आमदाराच्या या कृतीवर आक्षेप घेत याबद्दल संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.