
नागपूर - भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून देशभरातील संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरील समुद्र कासवांची संख्या, त्यांच्या सवयी, घरटे करण्याचे स्थान, घरट्यांमध्ये नव्याने उत्पत्ती होणाऱ्या कासवाचा अभ्यास केल्या जात आहे. २०२३-२४ मध्ये देशभरात केलेल्या अभ्यासात महाराष्ट्रात ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची (समुद्री कासव) तब्बल २० टक्के घरटी असल्याचा पहिला अहवाल वन विभागाला मिळाला आहे.