esakal | Corona : राज्यातील संसर्गाचा दर १०.९३ टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona : राज्यातील संसर्गाचा दर १०.९३ टक्के

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील वेगवेगळ्या प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांपैकी १०.९३ टक्के रुग्णांना कोरोना झाला आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. राज्यात संसर्गाचा हा दर १० सप्टेंबरला ११.६५ टक्के होता. तो आता कमी झाल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून कोरोनाची प्रयोगशाळा चाचणी सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत सहा कोटी एक लाख ९८ हजार १७३ जणांना कोरोनाची चाचणी केली आहे. त्यापैकी ६५ लाख ७७ हजार ८७२ (१०.९३ टक्के) रुग्णांना कोरोनाचे निदान झाले. राज्यात १० सप्टेंबरला कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ६४ लाख ९१ हजार १७९ होती. त्या वेळी पाच कोटी ५७ लाख दोन हजार ६२८ जणांनी राज्यातील प्रयोगशाळांमधून तापसणी केली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली.

राज्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग पुणे जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख ४७ हजार ४३६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ११ लाख १९ हजार १५९ रुग्ण कोरोनातून खडखडीत बरे झाले. जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ९७.५ टक्के आहे. मात्र, १९ हजार ५०६ रुग्णांचा यात मृत्यू झाला, असे सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले.

दृष्टीक्षेपात

  • कोरोनामुक्त झालेले रुग्ण : ६४ लाख एक हजार २८७

  • कोरोनातून बरे होण्याचा दर : ९७.३२ टक्के

  • कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण : एक लाख ३९ हजार ५४२

  • राज्यातील मृत्यूदर : २.१२ टक्के

  • ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या : ३३ हजार ४४९ राज्यातील संसर्गाचा दर १०.९३ टक्के

loading image
go to top