
मुंबई: राज्याच्या स्थापनेपासून तांत्रिक अभ्यासक्रम आणि त्यासाठीच्या ट्रेडचे शिक्षण, अभ्यासक्रम देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार आणि त्याचे धडे शिकायला मिळणार आहेत. नाशिक येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील आयटीआयमध्ये ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा नवा अभ्यासक्रम राबविला जाणार असल्याची माहिती सोमवारी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.