Maharashtra-Karnataka Row: शहांची नको मोदींची मध्यस्थी हवी; उदयनराजेंची आग्रही भूमिका

कालच्या बैठकीनंतरही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अद्यापही राजकीय मतमतांतरं सुरुच आहेत.
Amit Shah PM Modi
Amit Shah PM Modi
Updated on

सातारा : कालच्या बैठकीनंतरही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अद्यापही राजकीय मतमतांतरं सुरुच आहेत. यावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी टिप्पणी केली असून या वादामध्ये गृहमंत्री अमित शहांची नव्हे तर पंतप्रधानांची मध्यस्थी गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळं पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (Maharashtra Karnataka Border Row Mediation should do it by PM Modi says Udayanraje Bhosale)

Amit Shah PM Modi
Maharashtra-Karnataka Row: सुप्रीम कोर्टात हरीश साळवे मांडणार महाराष्ट्राची बाजू; अजित पवारांचा खुलासा

माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, भाषावर प्रांतरचना होणं अपेक्षित होतं पण तशी झाली नाही. यासाठी महाजन समिती नेमली गेली, पण या समितीलाही हे जमलं नाही. तुमच्या राजकारणामुळं सीमाभागातील लोकांची प्रगती खुंटली आहे. अशा विषयांमध्ये चर्चा किंवा मध्यस्थी पंतप्रधानांनी करणं गरजेचं आहे.

Amit Shah PM Modi
Maharashtra-Karnataka Row: शहांची नको मोदींची मध्यस्थी हवी; उदयनराजेंची आग्रही भूमिका

पंतप्रधानांनी राज्यातील नेत्यांची बैठक घ्यावी

संबंधित राज्यातील प्रमुख राजकीय नेते, पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी उदयनराजे यांनी मांडली. सीमाभागात राहणारे लोक महाराष्ट्रातील असोत किंवा कर्नाटकातील त्यांची यामध्ये काय चूक आहे. याबाबत तुम्ही माणुसकीचा विचार करणार आहात की नाही? असा सवालही यावेळी उदयनराजे यांनी केला आहे.

अमित शहांच्या उपस्थितीत पार पडली बैठक

आठवड्याभरापूर्वी झालेल्या महाराष्ट्र-कर्नाटक तणावाच्या पार्श्वभूमीवर काल यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त ट्विट आपण केलेलंच नव्हतं असं बोम्मई यांनी दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com