‘महाराष्ट्र कुणाचा?’ ‘साम’वर आजपासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘साम’ वाहिनीवर सोमवारपासून (ता. २६) पासून ‘महाराष्ट्र कुणाचा?’ हा चर्चात्मक कार्यक्रम सुरू होत आहे.

मुंबई - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘साम’ वाहिनीवर सोमवारपासून (ता. २६) पासून ‘महाराष्ट्र कुणाचा?’ हा चर्चात्मक कार्यक्रम सुरू होत आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. राज्यातल्या विविध समाजघटकांची मते जाणून घेतानाच राजकीय पक्षांचे राज्याच्या विकासासाठी काय कार्यक्रम आहेत, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

मतदारांच्या मनातल्या विकासाच्या कल्पना, त्यावर राजकीय पक्षांकडे असलेली उत्तरे, त्या त्या परिसराचा, पर्यायाने राज्याचा कसा विकास झाला, याचा लेखाजोखा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. राज्याच्या विविध शहरांमध्ये जाऊन तेथील शहरातील तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध समाजघटकांशी थेट संवाद साधणारा हा कार्यक्रम जळगावपासून सुरू होत आहे. लोकमान्य  मल्टिपर्पज को-आपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत ‘महाराष्ट्र कुणाचा?’ या कार्यक्रमाला निरमा ॲडव्हान्स्ड आणि श्रीराम ठिबक सिंचनचे पाठबळ मिळाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra konacha talk show on Saam TV