
नाशिक : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात (corona vaccination drive) महाराष्ट्राने (maharashtra state) देशात आघाडी कायम ठेवली आहे. देशाच्या एकूण १०.७९ टक्के लसीकरण राज्यात झाले आहे. दुसऱ्या स्थानावर राजस्थान (८.२३ टक्के) आहे, तर गुजरातमध्ये ८.१४ टक्के आणि उत्तर प्रदेशात ८.१० टक्के लसीकरण झाले. त्याचवेळी गेल्या सहा दिवसांमध्ये पाच दिवस देशामध्ये २४ तासांतील कोरोनामुक्तांची संख्या ही रुग्णांपेक्षा अधिक आहे. त्यातही महाराष्ट्र अव्वल असून, महाराष्ट्रातील ५९ हजार ७३, तर कर्नाटकमधील ३४ हजार ४२५ कोरोनामुक्त (corona free) झालेत.
महाराष्ट्राची लसीकरणातील आघाडी
देशात १८ कोटी २२ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. १८ ते ४४ वयोगटांतील ४८ लाखांहून अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात एक कोटी ९६ लाख ६४ हजार ६३ जणांचे लसीकरण झाले आहे. राजस्थानमध्ये एक कोटी ४९ लाख ९१ हजार ४२५, गुजरातमध्ये एक कोटी ४८ लाख ३२ हजार ७२२, उत्तर प्रदेशात एक कोटी ४७ लाख ६४ हजार ९४२ जणांचे लसीकरण झाले आहे.
२४ तासांत नवीन रुग्णांमध्ये कर्नाटक पहिल्या आणि महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
देशात २४ तासांत देशात तीन लाख ११ हजार १७० नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यात कर्नाटकमधील ४१ हजार ६६४, महाराष्ट्रमधील ३४ हजार ८४८, तमिळनाडूमधील ३३ हजार ६५८, केरळमधील ३२ हजार ६८०, उत्तर प्रदेशातील १२ हजार ५१३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्तीचे देशात ८४.२५ टक्के, तर महाराष्ट्राचे प्रमाण ८९.२ टक्के झाले आहे. तसेच देशाचा मृत्युदर १.०९ टक्के आहे. २४ तासांत देशात चार हजार ७७ रुग्णांची मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील ९६० आणि कर्नाटकमधील ३४९ मृतांचा समावेश आहे. सक्रिय रुग्णसंख्येत २४ तासांत देशामध्ये ५५ हजार ३४४ रुग्णांची घट झाली असून, त्यात महाराष्ट्रातील २५ हजार १४८, तर उत्तर प्रदेशातील १६ हजार १७२ रुग्णांचा समावेश आहे. मात्र दुसरीकडे तमिळनाडूमध्ये १२ हजार ४५०, कर्नाटकमध्ये सहा हजार ९८० सक्रिय रुग्णसंख्या २४ तासांत वाढली आहे.
पॉझिटिव्हिटीचा दर कमी
देशामध्ये गेल्या तेरा दिवसांच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर कमी झाला आहे. आज पॉझिटिव्हचा दर १६.९८ टक्के इतका राहिला. ११ मेपासून पॉझिटिव्हिटीचा दर कमी होण्यास सुरवात झाली असून, त्यादिवशी १७.८३ टक्के पॉझिटिव्हिटीचा दर राहिला. तत्पूर्वीच्या दिवसनिहाय पॉझिटिव्हिटीचा दर टक्क्यांमध्ये असा : ३ मे- २४.४७, ४ मे- २१.४७, ५ मे- २४.८०, ६ मे- २१.४४, ७ मे-२२.६८, ८ मे- २२.१८, ९ मे- २१.६४, १० मे- २४.८३.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.