पीकविम्यात महाराष्ट्राची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 August 2020

डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा योजनेत कृषी विभागाने ८६ लाखाहून जास्त शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करीत देशात विक्रम केला आहे. या कामगिरीबद्दल राज्याच्या कृषी सांख्यिकी विभागाचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान संचालकांनी कौतुक केले आहे.

पुणे - डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा योजनेत कृषी विभागाने ८६ लाखाहून जास्त शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करीत देशात विक्रम केला आहे. या कामगिरीबद्दल राज्याच्या कृषी सांख्यिकी विभागाचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान संचालकांनी कौतुक केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीकविमा नोंदणी जलदपणे होत नव्हती. कारण, भूमिअभिलेख एकत्रीकरण, पडताळणी यापूर्वी ऑनलाइन उपलब्ध नव्हती. तथापि, मुख्य सांख्यिक उदय देशमुख यांनी सतत पाठपुरावा करीत एकत्रीकरणाचा टप्पा पार पाडला. कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार आणि विस्तार संचालक नारायण शिसोदे यांनी सांख्यिकी विभागाला प्रोत्साहन देत ऑनलाइन नोंदणीतील समस्या दूर केल्या गेल्या. 

नोंदणी, पडताळणीची कामे कागदमुक्त झाल्याने दरतासाला हजारो विमा पोर्टलवर अपलोड होऊ लागले.  भूअभिलेख पडताळणी, विमा हप्ता, नोंदणी, पोचपावती वितरण असे सर्व टप्पे ऑनलाइन झाल्याने पीकविमा योजनेत राज्याचे काम अव्वल बनले. 

देशात प्रथमच भूमिअभिलेखाचा डेटा व पीक विमा पोर्टल संलग्न करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचा कागदपत्रे जमा करण्यासाठी लागणारे श्रम, वेळ वाचला आहे. नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली.
- एकनाथ डवले, कृषी सचिव

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra leads in crop insurance