Wed, August 17, 2022

Assembly Session 2022: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले
Published on : 15 July 2022, 1:15 pm
मुंबई : येत्या १८ जुलैपासून होत असलेले विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र विधिमंडळाने अधिकृत पत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
(MLC Session Postponed)
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख २०२२ च्या प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १८ जुलै २०२२ पासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. पण संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. पण अधिवेशनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं विधिमंडळाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

Web Title: Maharashtra Legislative Council Session 2022 Postponed
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..