महाराष्ट्र विधान परिषदेची महत्त्वाची बैठक उद्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019

- विधानसभेचे विशेष अधिवेशनही उद्याच.

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेची बैठक उद्या (रविवार) आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या सर्व सदस्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीत पास झाले आहेत. त्यानंतर आता विधान परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 1 डिसेंबरला (उद्या) सायंकाळी चार वाजता ही बैठक होणार आहे.

मंगळवारी होणार कर्जमाफीची सर्वांत मोठी घोषणा

याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या 1 डिसेंबरला घेण्यात येणार असून, याचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अपर सचिव यांनी दिली. 

सौजन्य : डीजीआयपीआर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Legislative Councils Important Meeting on 1 st December