Maharashtra Literacy : पुरोगामी महाराष्ट्रात पावणेदोन कोटी निरक्षर

नागपूरचे साक्षरता प्रमाण ८८.३९ टक्के इतके असून विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यापेक्षा ते २ टक्क्यांनी जास्त आहे.
Illiteracy in Maharashtra
Illiteracy in MaharashtraSakal

मुंबई, ता. १३ : पुरोगामी महाराष्ट्रातील तब्बल १ कोटी ७५ हजार जनता निरक्षर आहे. घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राने १०० टक्के साक्षरतेचे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे, याची सर्वंकष योजना प्रदत्त मंत्रिगट लवकरच तयार करणार असल्याचे समजते.

महाराष्ट्राची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी ८ लाख मानली जाते. राज्यातील मोबाईलची संख्या आहे जवळपास १३ कोटी. ही आकडेवारी प्रगतीच्या खुणा दाखवणारी. तरीही या राज्यातील निरक्षर लोकसंख्येचा आकडा आहे १ कोटी ७५ लाख. सध्या भारतात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा आनंदोत्सव साजरा केला जातो आहे.

Illiteracy in Maharashtra
Eknath Shinde : श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे ११व्या स्थानी, 'इतकी' आहे संपत्ती

केंद्र सरकारने अमृतकालानिमित्त देशाने साधलेल्या सामाजिक प्रगतीचा आढावा घेतला. त्यात प्रत्येक राज्यातील साक्षरतेचे प्रमाण शोधून अंदाज घेतला असता देशभरात १४ कोटी निरक्षर असल्याची माहिती समोर आली. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारने राज्यवार निरक्षरतेचा आढावा घेणे सुरु केले.

अमृतमहोत्सवी वर्षात सर्वसाक्षरतेकडे लक्ष द्या, असे निरोप पाठवितानाच राज्यांना निरक्षरांची आकडेवारी पाठविण्यात आली. निरक्षरांच्या आकड्याचा मंत्र्यांना धक्काच बसला, असे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा आकडा खरा आहे काय,याचा स्रोत कळू शकेल काय, अशी विचारणा केंद्र सरकारला केली असून दुसरीकडे हे निरक्षर हुडकून त्यांना साक्षर करण्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

Illiteracy in Maharashtra
Eknath Shinde : "आम्ही आहोत..."; लाँग मार्चमधल्या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला Cm शिंदेंचा भावनिक आधार

महाराष्ट्रात ८४ टक्के जनता साक्षर असल्याचे मानले जात होते. कोरोनामुळे २०२१ ची जनगणना अद्याप झाली नसली तरी जी अनुमाने सांख्यिकी विभागाने निश्चित केली आहेत, हे प्रमाण १०० टक्क्यांवर नेण्याचा मानस मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. विद्यापीठांचे प्रौढशिक्षण विभाग, निरंतर शिक्षण विभाग यांना कामी लावण्याची योजना आखण्याचेही ठरले.

नंदुरबार सर्वाधिक निरक्षर, पुण्यापेक्षा नागपूर साक्षर

महाराष्ट्रात नंदूरबार या आदिवासी जिल्ह्यात सर्वांत कमी साक्षर असून तेथील साक्षरतेची टक्केवारी ६४.३८ इतकी आहे. जालना, धुळे, परभणी, गडचिरोली, या मानवी निर्देशांकात मागे असलेल्या जिल्ह्यांत निरक्षरांचे प्रमाण जवळपास २५ टक्के असल्याचा अंदाज आहे. या पाहणीत काही विचार करण्यासारखे निष्कर्ष समोर आले असून, नागपूरचे साक्षरता प्रमाण ८८.३९ टक्के इतके असून विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यापेक्षा ते २ टक्क्यांनी जास्त आहे. पुण्याचे साक्षरता प्रमाण ८६.१५ टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com