दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Live News Update :

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

दहावी-बारावीच्या बोर्ड परिक्षेच्या प्रश्नपत्रिका १० मिनिट आधी मिळणार नाहीत. पेपर फुटीच्या घटना टाळण्यासाठी राज्य शिक्षण महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

जम्मू काश्मिरमध्ये सालालकोट, रियासी येथे सापडले लिथियमचे साठे

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण सलालकोट भागातील बॉक्साईट साठ्यावर गेल्या ५-६ वर्षांपासून काम करत होते. त्यांच्या अहवालानुसार, या बॉक्साईट संमिश्रामध्ये ५.९ दशलक्ष टन लिथियमचा साठा उपलब्ध आहे.

लष्कराकडून १०८ महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू

सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितले की निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून लष्कर १०८ महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर नियुक्त करण्याची प्रक्रिया करत आहे.

बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केले - नरेंद्र मोदी

मी इथे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून आलेलो नागी. माझे भाग्य असे आहे की मी चार पिढ्यांपासून या कुटुंबाशी जोडलेला आहे. काळ आणि विकासाच्या बदलाच्या निकषांवर बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. आज अल्जामिया-तुस-सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.

मी बोहरा कुटुंबातील सदस्य आहे - नरेंद्र मोदी

यावेळी नरेंद्र मोदी यांनी उपस्थित समुदायाला संबोधित केले. मी बोहरा कुटुंबातील सदस्य आहे. माझ्या ४ पिढ्या बोहरा मुल्सिम समाजासोबत गेल्या आहेत. या समाजाने दरवेळी स्वत:ला सिद्ध केले.

पाणी वाचवण्यासाठी बोहरा समाजाचे मोठं काम आहे. परदेशात गेलो तरी बोहरा समाजातील बांधव भेटण्यासाठी येतात. त्यांचे भारतावर प्रेम आहे.

नरेंद्र मोदींनी केले बोहरा मुस्लिम समुदाय संकुलाचं उद्घाटन

अंधेरीतील मरोळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोहरा मुस्लिम समुदायाचे अलजेमा-तूस-सैफी संकुलाचं उद्घाटन केले. यावेळी मद्रास बँडकडून मोदींचे स्वागत करण्यात आले.

वंदे भारत ट्रेन हे आजच्या आधुनिक भारताचे एक भव्य चित्र - नरेंद्र मोदी

वंदे भारत ट्रेन हे आजच्या आधुनिक भारताचे एक भव्य चित्र आहे. हे भारताच्या गती आणि प्रमाणाचे प्रतिबिंब आहे. देश वंदे भारत किती वेगाने सुरू करत आहे ते तुम्ही पाहू शकता. १० ट्रेन सुरू झाल्या आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

मुंबई आणि पुण्यासारख्या आर्थिक केंद्रांना भक्तीच्या केंद्रांशी जोडतील - नरेंद्र मोदी

पहिल्यांदा २ वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. ह्या ट्रेन मुंबई आणि पुण्यासारख्या आर्थिक केंद्रांना भक्तीच्या केंद्रांशी जोडतील. महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि कार्यालयात जाणारे लोक, शेतकरी आणि भाविक यांना याचा फायदा होईल - नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात पर्यटन आणि तिर्थक्षेत्राला चालना मिळेल

वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तिर्थक्षेत्राला चालना मिळेल. देशात मेट्रोचा विस्तार होत आहे. तसेच नवीन विमानतळ बनवल्या जात असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात मी केली. वंदे भारत ट्रेनला समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे, असे मोदी म्हणाले. रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशातील नववी आणि दहावी ट्रेन सुरू झाली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

आर्थिक राजधान्यांना ह्या ट्रेन जोडल्या जाणार आहेत. मोठ्या गतीने देशात वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या. देशातील १७ राज्यातील १०८ जिल्ह्यात वंदे भारत ट्रेनने जोडले आहेत.

नरेंद्र मोदींनी वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा

मुंबईतून दोन वंदे भारत गाड्या एकाच वेळी धावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून एक गाडी साई नगर शिर्डी आणि दुसरी सोलापूरला रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे.

महाराष्ट्रात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क - एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. यावेळी मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महाराष्ट्रला १३ हजार ५०० करोड रेल्वेसाठी मिळाले हे पहिल्यांदा घडले आहे. हे सामान्य लोकांचे सरकार आहे. हे फक्त केंद्राच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मानले आभार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनअंतर्गत रेल्वे चांगली प्रगती करेल, असे ते म्हणाले.

कोणी कल्पना केली नसेल भारतात अशा प्रकारची गाडी धावेल - फडणवीस

कोणी कल्पाना केली नसेल भारतात अशा प्रकारची गाडी धावेल. मात्र नरेंद्र मोदी यांची ही किमया आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव इतिहासात लिहले जाईल.

मुख्यमंत्र्यांनी गणपतीची मुर्ती देऊन नरेंद्र मोदींचे स्वागत केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी स्थानकात दाखल झाले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांना गणपतीची मुर्ती देऊन स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी स्थानकात दाखल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी स्थानकात दाखल झाले आहेत. ते दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याठीकाणी पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

२२ दिवसांमध्ये नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहेत 

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ दिवसांमध्ये दुसऱ्यांना मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे विरोधक टीका करत आहेत.

मुंबईतून एकाच वेळी दोन वंदे भारत ट्रेन धावण्यासाठी सज्ज, नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा  

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून दोन वंदे भारत गाड्या एकाच वेळी धावण्यासाठी सज्ज झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून एक गाडी साई नगर शिर्डी आणि दुसरी सोलापूरला जाईल. अशाप्रकारे देशभरात १० वंदे भारत गाड्या सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

राहुल कलाटेंची अखेर माघार नाहीच

राहुल कलाटे यांनी शिवसेना पक्षअध्याक्ष उद्धव ठाकरे यांचा शब्द धुडकावूण लावत पोटनिवडणुक लढण्याचा निर्णय काय ठेवला आहे.. चिंचवडच्या जनतेचा आदर करण्यासाठी मी निवडणुक लढवणारआहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल

पंतप्रधान मोदी आज मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान मुंबईत त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित आहेत.

पुणे पोटनिवडणुकीतून आपची माघार

महाराष्ट्रातील पोटनिवडणूक न लढवण्याचा आम आदमी पार्टीने निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभांची निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढण्याचा निर्धार केला आहे. सद्या आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे, अशी घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

थोरातांच्या राजीनाम्याबद्दल माहिती नाही; नाना पटोलेंकडून पुनरुच्चार

काँग्रेसमध्ये कुठेही वाद नाही. काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विधान परिषदेचा पराभवर जिव्हारी लागल्याने भाजपचे हे कृत्य. एच के पाटलांशी चर्चा झालीय. पुण्यातील पोटनिवडणुकीत दोन्ही उमेदवार जिंकणार. तसेच कॉंग्रेसमध्ये कोणतीही खदखद नाही. थोरातांच्या राजीनाम्यासंदर्भात अजूनही माहिती नाही.

मोदींच्या दौऱ्याला यश नाही. त्यांच मुंबई स्वागत आहे. राऊतांनी माझ्या शक्तीची जाणीव करुन दिली.

उद्धव ठाकरेंची शिष्टाई फळाला; संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांची बंडाई थंड

संभाजी ब्रिगेडच्या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. कसब्यातून अविनाश मोहित तर चिंचडवडमधून प्रवीण कदम यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये 5.9 मिलियन टन सापडला लिथियमचा साठा

जम्मू आणि काश्मीर मध्ये उत्खनन सुरु असताना तब्बल 5.9 मिलियन टन इतका भलामोठा लिथियमचा साठा सापडल्याचे पुरातत्व खात्याने घोषित केले. इलेक्ट्रिक साहित्य निमिर्तीसाठी लिथियम खूप महत्त्वाचे मानले जाते हे विशेष, त्यामुळे येणाऱ्या काळात भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधला मोठा भाग ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे.

अर्ज मागे घेण्यावर राहुल कलाटेंनी मांडली भूमिका, म्हणाले...

सचिन अहीर यांच्यासोबत चर्चा झाली. माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन माझा निर्णय घेतो. असं मोठ विधान राहुल कलाटे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

उद्धव ठाकरेंकडून राहुल कलाटेंची मनधरणी

शिवसेनेचे उपनेते सचिन अहीर यांनी आज चिंचवड उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करत अर्ज मागे अशी विनंती केली. यासंदर्भात शिवसेना पक्षअध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही कलाटे यांच्याशी संवाद साधला असल्याची माहिती अहीर यांनी दिली आहे.

चिंचवडमध्ये ४० लाखांची रोकड जप्त; निवडणुक आयोगाची कारवाई

चिंचवडमध्ये एका कारमधून ४० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई निवडणुक आयोगाकडून करण्यात आली आहे. ही घटना दळवी नगर भागात घडली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे.

राहुल कलाटे यांच्या भेटीसाठी सचिन अहीर दाखल

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज निर्णयक दिवस आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. अशातच राहुल कलाटे यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे उपनेते सचिन अहीर कलाटे यांच्या घरी दाखल झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक प्रकरण सव्वा महिन्यानी लांबणीवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण सव्वा महिन्यानी लांबणीवर पडलं आहे. एप्रिल मे महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता मावळली आहे. कोर्टाने पुढची तारीख 14 मार्च दिल्याने निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्यावर शंका कायम.

निवडणुकांपर्यंत मोदींचा मुक्काम मुंबईतच; राऊतांनी केला मोठा दावा

महापालिका जिंकण्यासाठी पंतप्रधान यांचा मुंबई दौरा आहे. मात्र, मुंबई पालिका आम्हीच जिंकणार. शिंदे गट आणि भाजप मुंबई पालिकेसाठी असमर्थ आहेत. निवडणुकीपर्यंत मोदींचा मुंबईत मुक्काम असु शकतो. असा दावा संंजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

तसेच, संसदेत मोदींनी राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर का दिली नाहीत.

गायीला मिठी कशी मारायची? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

केंद्र सरकारने येत्या 14 फेब्रुवारी रोजी काऊ हग डे साजरा करण्यास सांगितलं आहे. गायींना प्रेमाने मिठी मारण्याचे फर्मान सरकारने काढले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यात उडी घेतली आहे. गायीला मिठी कशी मारायची? कुठून मारायची? असा सवाल उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर

शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. कादवा साखर कारखाना इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर मविप्रच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या नितीन ठाकरे यांचा सक्तार यावेळी होणार आहे. पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पार पडणार आहे.

इस्त्रो SSLV-D2 लाँच झाले

इस्त्रोने तीन उपग्रह EOS-07, Janus-1 आणि AzaadiSAT-2 उपग्रहांना 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत ठेवण्यासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्मॉल सॅटेलाइट व्हेईकल-SSLV-D2- प्रक्षेपित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर अंधेरी मरोळ येथील बोहरा समाजाच्या अरबी अकादमीचंही मोदींच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे. पुण्यात दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. राहुल कलाटे अर्ज मागे घेणार याकडे सर्वोचे लक्ष वेधले आहे. इस्त्रो SSLV-D2 लाँच झाले आहे. तुर्की-सीरीया भूकंप अपडेट्स येतील. अनेक दिवसभर घडामोडी पाहायला मिळतील.