Marathi News Update:महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Chief Minister Eknath Shinde news
Chief Minister Eknath Shinde newssakal

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केईम रुग्णालयाला भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईम रुग्णालयाला भेट दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेला देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५व्या ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत.

'स्पेशल ऑप्स 3'चे चित्रीकरण लवकरचं सुरु होणार, मुख्य अभिनेत्याने केले स्पष्ट

'स्पेशल ऑप्स ३' या वेब सिरिजचे चित्रिकरण लवकरचं सुरु करण्यात येणार आहे. याबद्दल मुख्य अभिनेते केके मेनन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

'हा प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचा क्षण', चांद्रयानच्या लँडिंगवर करीनाने व्यक्त केल्या भावना

भारताचे चांद्रयान-३ लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होईल. याबाबत अभिनेत्री करिना कपूरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली की हा प्रत्येक भारतीयसाठी गर्वाचा क्षण असणार आहे.

उत्तरप्रदेश दौऱ्याबद्दल रजनीकांत यांनी सांगितला केला अनुभव

साऊथ स्टार रजनीकांत काही दिवस उत्तरप्रदेशमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी त्याच्या उत्तरप्रदेश भेटीचा अनुभव सांगितला आहे.

तलाठी भरतीतील गोंधळामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुण्यात आंदोलन

तलाठी भरतीचं वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँंग्रेसने पुण्यात आंदोलन केलंय.

विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची तारीख जवळ, अजित आगरकरांचे वक्तव्य

अजित आगरकर यांनी माहिती दिलीये की विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर असणार आहे.

राज्यात रासप स्वबळावर निवडणूक लढवणार, महादेव जानकरांची घोषणा

राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी घोषणा केली आहे की, आगामी काळात रासप स्वबळावर निवडणूका लढवेल.

माझगाव कोर्टाकडून संजय राऊतांना जामीन मंजूर

शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांचा माझगाव कोर्टाने जामीन मंजुर केला आहे. राहुल शेवाळेंची बदनामी केल्याचा त्यांच्यावर आरोप केला होता. कोर्टाने १५ जाचमुचकल्यावर त्यांना जामीन मंजूर केला.

'मला वाटत नाही भारत...'विश्वचषकाबाबत सौरव गांगुलीचं भाकीत

एकदिवसीय विश्वचषक सुरु होण्यात अगदी काही काळ शिल्लक राहिलाय. यावेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला की, "मला नाही वाटतं भारत कोणत्याही एका संघावर फोकस करेल. ते प्रत्येक सामना योग्यरित्या खेळण्याचा प्रयत्न करुन फायनलपर्यंत प्रवास करतील. विश्वचषक जिंकण्याची भारतीय संघाला नेहमी संधी असते."

वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे मुंबईत काढली जाणार संविधान बचाव यात्रा

संविधानाच्या रक्षणासाठी आज मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे संविधान बचाव यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेमध्ये मुंबई काँग्रेसचे प्रमुख नेते, आजी-माजी आमदार-खासदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

दिल्लीतील तो सरकारी अधिकारी पोलिसांच्या ताब्यात; गुन्हा दाखल

बुरारी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी दिल्लीतील सरकारमधील निलंबित झालेल्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिनेट निवडणुकीवरून ठाकरे गटाचे पदाधिकारी विद्यापीठात दाखल

सिनेट निवडणुकीवरून ठाकरे गटाचे पदाधिकारी विद्यापीठात दाखल झाले आहेत. निवडणूक स्थगित करण्याचं कारण चुकीचं आहे, त्याचबरोबर एकाच नावाचे दोन उमेदवार असल्याचा दावा यावेळी ठाकरे गटाने केला आहे. त्याचबरोबर निवडणूक स्थगित करण्यात आलं त्याच जे कारण दिलं आहे ते चुकीचं आहे म्हणत युवा सेनेकडुन कुलगुरांना घेराव घालण्यात आला आहे.

जपानमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केला बुलेट ट्रेनने प्रवास

जपानमध्ये देवेंद्र फडणवीसांनी बुलेट ट्रेनने प्रवास केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधील मराठी नागरिकांचे आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी जपानमधील मराठी नागरिक होते उपस्थित. मराठी भाषा, धर्म , सतासमुद्र पलीकडे जिवंत ठेवला म्हणून फडणवीसांनी जपानमधील मराठी नागरिकांचे आभार मानले आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तर ४ जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिली. यामध्ये एका महिलेसह दोन जण जागीच ठार

देवेंद्र फडणवीसांचं टोक्यो विमानतळावर जपानमधील मराठी लोकांकडून मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ दिवसांसाठी जपान दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये दाखल होताच टोक्यो विमानतळावर जपानमधील मराठी लोकांनी फडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत केलं. या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही भेटी घेणार आहेत.

नागपूरातील तलाठी परिक्षा असलेल्या काही केंद्रांवर सर्व्हर पुर्वपदावर

तलाठी पदासाठीची परीक्षा खोळंबली आहे, काही सर्व्हर डाऊन असल्याने परीक्षेसाठी आलेले उमेदवार केंद्राबाहेर दिसत आहेत. सकाळी 9 वाजता परीक्षा होणार होती. दरम्यान काही सर्व्हर पुर्वपदावर येत आहेत.

पहिल्या श्रावण सोमवार निमीत्ताने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नाशिक जिल्ह्यासह देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

संजय राऊत मुंबईच्या 'या' जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार?

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत 2024 लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईशान्य मुंबईतून संजय राऊत निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू आहे. संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे . राऊत मुंबईच्या ईशान्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com