Marathi News Live Update : रशियातील बंड ते मणिपूरमधील हिंसाचार; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Live Update : रशियातील बंड ते मणिपूरमधील हिंसाचार; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

मुंबईत पावसाचा हाहाःकार, डोळ्यादेखत वाहनं वाहून गेली

मुंबईत आज झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शहरातील अनेक रसत्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अंधेरी सब-वे येथे पाण्यात वाहनं बुडून वाहून गेल्याची घटना घडली आहे.

मणिपूरमधील बॉम्बस्फोट प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग

मणिपूरमधील बॉम्बस्फोट प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला 

मणिपूर प्रश्नावरची केंद्राची बैठक संपली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेली मणिपूर हिंसाचार प्रकरणाची बैठक संपन्न झाली. सर्वपक्षिय बैठक काही वेळापूर्वीच संपन्न झाली.

नरेंद्र मोदी इजिप्तमध्ये दाखल, पंतप्रधानांनी केलं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कैरो येथे विमानतळावर दाखल झाले. इजिप्तच्या पंतप्रधानांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

परदेशातील लोक मला म्हणतात, तुमच्यामुळे वाचलो- उद्धव ठाकरे

आजही मी जिथे जातो जिथे लोक मला भेटतात. परदेशातही लोक मला भेटली. नमस्कार केला. म्हणाले, साहेब तुमच्यामुळे आम्ही वाचलो. परदेशातील लोक म्हणाले, हे लोक तुमच्या सोबत जे करत आहेत, ते योग्य नाही. आम्ही तुमच्यासोबत आहे. या जळणाऱ्या पेक्षा आशीर्वाद देणारे अनेक आहेत !

असं ट्वीट उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

शहरातील शिवाजी नगर, विद्यापीठ चौक, गोखले नगर, बाणेर रोड, औंध, सांगवी या भागात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनधारकांना सामोरं जावं लागत आहे.

रशियन फौजांकडून वॅगनर ग्रुपवर कारवाई

वॅगनर ग्रुपच्या ठिकाणांवर रशियांने कारवाई केली आहे. मॉस्कोमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलेला असून रशियन फौजांकडून वॅगनर ग्रुपवर कारवाई करण्यात येत आहे.

सूडभावनेने कुठलीही कारवाई नाही- एकनाथ शिंदे

सूड भावनेने कुठलीही कारवाई आम्ही करत नाही. ईडीची कारवाई स्वतंत्र आहे. त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करीत नाही, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

सांगलीतील कारवाईप्रकरणी बँकेचं स्पष्टीकरण

सांगलीत आज बँकेत ईडी ने १० वर्षापूर्वी VAT प्रकरणी काही व्यापरंची माहिती मागितली होती. बँकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. सांगली बँक प्रकरणी बँकेकडून स्पष्टीकरण.

दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मणिपूर हिंसाचार प्रश्नावर सर्वपक्षीयांची बैठक सुरू...

मावळमध्ये पुन्हा मीच जिंकणार, अजित पवारांनी ताकद लावावी- श्रीरंग बारणे

अजित पवार यांनी पुन्हा एकदा ताकद लावून पाहावी, मावळमध्ये मीच जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे

देशातील १४ राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही - संजय राऊत

देशातील १४ राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, अनेक राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. बिहारमध्ये भाजप जिंकू शकत नाही असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

पुणे शहर परिसरातील विविध भागात पावसाची हजेरी

खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी सणसनगर व सिंहगड परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

शासकीय महापूजा असतानाही मुखदर्शन सुरू राहणार शासनाचा मोठा निर्णय

शासकीय महापूजा असतानाही मुखदर्शन सुरू राहणार असल्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे.

मणिपुर हिसांचार केंद्र सरकार रोखू शकलं नाही- संजय राऊत

मणिपूरच्या प्रकारे पेटले ते केंद्र सरकार रोखू शकलं नाही हे केंद्र सरकारचं अपयश आहे असा घणाघाती टोला संजय राऊत यांनी केला आहे. ते प्रकरण गृहमंत्र्यांच्या केंद्र सरकारच्या नियंत्रणात राहिलेला नाही. तर पोलादी पुरुष असताना देखील ते मनिपुर हिंसाचार थांबवू शकलो नाही असं त्यांनी म्हंटलं आहे.

पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

पुण्यातील कात्रज, कर्वे नगर, चांदणी चौक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज आणि उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.विदर्भाच्या काही भागामध्ये काल (शुक्रवारी) मान्सूनचं आगमन झालं आहे. तर पश्चिम विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांसह मुंबईतही काल (शुक्रवारी) सकाळी तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत.

तर मुंबईतील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. दादर, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, वरळी, मुंबई सेंट्रल परिसरात पावसानं हजेरी लावलीय. पुढील ७२ तासात सलग मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com