Marathi News Updates : दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Updates : दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

पीचडी स्कॉलर बनला दहशतवादी, आंतकवाद्यांचं भरती रॅकेट उध्वस्त

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांची भरती करणारं रॅकेट उघडकीस आलंय. यामध्ये एका पीएचडीधाकर व्यक्तीला अटक करण्यात आली. या दहशतवाद्याने सेंट्रल युनिवर्सिटी ऑफ काश्मिरमधून डॉक्टरेट प्राप्त केली. या दहशतवाद्याचा संबंध हिजबूल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांशी असल्याची माहिती समोर आली आहे. यांच्याकडून बंदुका आणि जिवंत काडतुस मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आले आहेत.अशी माहिती कुलगाम पोलिसांनी दिली.

शिवशाही एसटी अन् ट्रकचा अपघात; चालक प्रवाशाच्या वादात घडली दुर्घटना

वैजापूर मार्गावर शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर शिवशाही बस आणि ट्रकचा अपघात झाला सुदैवाने यात कोणीही प्रवाशी जखमी झाले नाही. बस मध्ये कंडक्टर नसल्यामुळे एका प्रवाशाला तिकीट काढावे लागले ही प्रवासी कॅमेरा समोर सांगत असताना चालकाने प्रवाशावर हात उचलला. गंगापूर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

कारगिल विजय दिनानिमित्त त्रिशूल युद्ध स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाकडून ३ कोटींचा निधी

कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युध्द स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ३ कोटीचा निधी सुपूर्द करण्यात आला.

मध्य रेल्वे सुरु करणार १८ स्पेशल ट्रेन्स, गणेशोत्सवात प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करणार

गणपती बसण्याच्या काळात रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वे स्पेशल १९ ट्रेन्स सुरु करणार आहे. सुरु करण्यात येणाऱ्या या ट्रेन्स अनारक्षित असणार आहेतय या ट्रेन्स लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ या स्थानकामध्ये चालतील. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत ही सेवा सुरु राहिल.

१ ऑगस्टला होणार महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, बैठकीला उद्धव ठाकरेही राहणार उपस्थित

राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक १ ऑगस्टला होणार असल्याची माहिती मिळतं आहे. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उद्धव ठाकरेही हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हरियाणातील गुरुग्राम येथील किंगडम ऑफ ड्रीम्सच्या तळघरात आग

हरियाणातील गुरुग्राम येथील किंगडम ऑफ ड्रीम्सच्या तळघरात आज आग लागल्याची घटना समोर आली आहे. नंतर अग्निशमन विभागाच्या कारवाईने आग आटोक्यात आणण्यात आली अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.

दर्डा पिता-पुत्रांना यांना ४ वर्षांची शिक्षा

कोळसा घोटाळा प्रकरणी विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांनी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

जुलै ते सप्टेंबर कालावधित दिल्लीत चार 'ड्राय डे'

दिल्ली सरकारने जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी चार ड्राय डे घोषित केले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

या यादीत 29 जुलै रोजी मोहरम, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन, 07 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी आणि 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद यांचा ड्राय डे मध्ये समावेश असणार आहे. दिल्ली सरकार दर तीन महिन्यांनी 'ड्राय डे'ची यादी जारी करते.

पुण्यातील अग्निशन दलातील स्टेशन ड्युटी ऑफिसरवर राज्य सरकारची कारवाई

पुणे जिल्ह्यातील कात्रज अग्निशन दलातील स्टेशन ड्युटी ऑफिसरवर राज्य सरकारची कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर राज्य सरकार कडून दाखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. हे अधिकारी फायर NOC साठी स्थानिकांना नाहक त्रास देत असल्याची तक्रार आली होती.

मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यास लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांनी मांडलेला सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव स्वीकारला आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव सभागृहात आणला.

मणिपूर मुद्द्यावर विरोधक आक्रमक! दुपारी 12 पर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला गोंधळात सुरुवात झाली. मात्र विरोधी पक्षांचा लोकसभेत गोंधळ आजही सुरूच राहिला. मणिपूरच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. मणिपुरच्या मुद्द्यावर काँग्रेसपाठोपाठ BRS चे खासदार नामा राव यांनी देखील केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रतेचा मुद्दा अखेर लांबणीवर

शिवसेना आमदारांच्या अपत्रतेचा निर्णय लांबणीवर गेला असून शिवसेनेच्या ४० आमदारांना दोन आठवड्यांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी शिवसेना आमदारांनी मुदत वाढवून मागीतली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ही मुदत वाढवून दिली आहे.

पावसाच्या स्थितीच्या आढाव्यासाठी आज अजित पवारांची  जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, अवर्षण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थोडयाच वेळात बैठक होणार आहे. मंगळवारी रद्द करण्यात आलेली बैठक थोडयाच वेळात पार पडणार असून

मंत्रालयात दालन क्रमांक 503, उपमुख्यमंत्री कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करम्यात आले आहे. बैठकीसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील बैठकीसाठी पोहचले आहेत.

औंढा नागनाथ मंदिरात लोखंडी गेट पडून एका मुलाचा मृत्यू

हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात लोखंडी गेट अंगावर पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळेमंदिर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे,

संरक्षण मंत्र्यांची कारगिल युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली

कारगिल विजय दिवसाच्या पार्श्वभूमिवर केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर पुष्प अर्पण करत 1999 च्या कारगिल युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात कोकणासह पश्चिम-मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा इशारा दिला असून. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असुन गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.