
मोदी सरकारला मोठा दिलासा; कोर्टाने 'ती' याचिका फेटाळली
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
मुंबई उच्च न्यायालयाला मिळाले नवीन न्यायाधीश
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती रमेश डी धानुका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राने शुक्रवारी अधिसूचना जारी केली आहे.
बीआरएसचे नेते दिल्लीतील कार्यक्रमाला जाणार नाहीत
बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे नेते संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाणार नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री हजेरी लावतील.
समीर वानखेडे चैत्यभूमीवर
आर्यन खान प्रकरणात सीबीआयकडून चौकशी सुरु असलेले एनसीबीचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे पत्नीसह चैत्यभूमीवर पोहोचले आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गावर दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गावर दाखल झाले आहे. काही वेळातच समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे.
राऊत म्हणजे बिनबुडाचं गाडगं- शहाजी पाटील
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे बिनबुडाचं गाडगं आहेत, अशी टीका शहाजी पाटील यांनी केली आहे. राऊत हे सतत खोके-खोके करत असतात, असंही पाटील म्हणाले.
फडणवीसांच्या कार्यक्रमात विखे-शिंदेंच्या खुर्चीचे नाट्य
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी फडणवीसांसमोरच मान-अपमान नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं. राम शिंदे यांनी व्यासपीठावर खुर्ची नसल्याने ते खाली निघून चालले होते मात्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत खुर्चीची व्यवस्था करून शिंदे यांना शेजारी बसवून घेतले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दाखल
अबू सालेमचा भाचा मोहम्मद आरिफ यूपी पोलिसांच्या ताब्यात
अबू सालेमचा भाचा मोहम्मद आरिफला यूपी पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात.
राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी लोकसभा सचिवालयाला निर्देश मागणाऱ्या जनहित याचिका दाखल करण्यास SC ने फेटाळली आहे.
महायुतीत मिठाचा खडा; शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, शिवसेना NDAचा घटक पक्ष आहोत, यापुर्वी नव्हतो, मात्र आमची काम झाली पाहिजे, आम्हाला तेवढा मान दिला पाहिजे, आम्हाला भाजपकडून सापत्न वागणूक दिली जाते, असा गंभीर आरोप गजानन किर्तीकर यांनी केला आहे.
जेजुरीमध्ये रास्तारोको; देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला
जेजुरीमध्ये देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला आहे. स्थानिकांकडून रास्तारोको करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार
ठाण्यातील अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार आहे. ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले.