Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर|LIVE Marathi News Updates Maharashtra Breaking News LIVE Marathi latest news Marathi Breaking News Mumbai live Updates Latest Marathi News Headlines Marathi News Headlines | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध २-१ ने मालिका विजय

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ६६ धावांनी पराभव झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा २-१ अशा फरकाने मालिका विजय झाला.

पाकिस्तानची क्रिकेट टीम हैद्राबाद विमानतळावर दाखल

पाकिस्तानची क्रिकेट टीम वर्ल्ड कपसाठी भारतात दाखल झाली आहे. क्रिकेट टीम हैद्राबाद विमानतळावर उतरली आहे. वर्ल्ड कप ५ ऑक्टोंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत भारतात खेळवले जाणार आहे. याआधी पाकिस्तान सराव सामने खेळेल.

मुलींच्या हॉस्टेलला आग; दिल्लीतील मुखर्जी भागातील घटना

दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये एका इमारतीला आग लागण्याची घटना घडली आहे. माहितीनुसार, मुलींच्या हॉस्टेलला आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. अद्याप नुकसानीबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

मुंबईतील गणेश विसर्जनानिमित्त १६ हजार पोलिस तैनात

मुंबईत गणपती विसर्जनानिमित्त 2800 पोलिस अधिकारी आणि १६ हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकारी सत्या नारायण यांनी दिली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येणार आहे.

मुलुंड पश्चिममध्ये मराठी महिलेशी गुजराती व्यक्तीने घातली हुज्जत

मराठी पाट्यांचा विषय सध्या चर्चेत असताना मुलुंड पश्चिममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठी असल्याने एक महिलेला सोसायटीमध्ये ऑफिस नाकारण्यात आले आहे. महाराष्ट्रीयन लोकांना सोसायटीत प्रवेश नसल्याचे एका गुजराती व्यक्तीने म्हटल्याचा आरोप मराठी महिलेने केला आहे. तसेच तिला आणि तिच्या पतीला धक्काबुक्की झाल्याचा आरोपही महिलेने केलाय.

कल्याण- डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस, कल्याण स्टेशन वरील ट्रॅकवर साचले पाणी

कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजेच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर दुसरीकडे कल्याण शिवाजी चौक ते मार्केट जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याचं दिसलं. पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला प्रवास करावा लागत आहे. कल्याण स्टेशन वरील ट्रॅकवर साचले पाणी

Marathi News Live Update: मणिपूरमधली परिस्थिती पुन्हा बिघडली, 1 ऑक्टोबर पर्यंत मणिपूर मध्ये इंटरनेट बंदी

2 जुलै पासून 2 मैतई मुलं गायब होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुन्हा वातावरण पेटलं/. CBI विशेष संचालक अजय भटनागर कालपासूनच मणिपूरमध्ये आहेत. मणिपूरमध्ये परिस्तिथी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पसरणी घाटात दत्त मंदिराजवळ दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

पसरणी घाटात दत्त मंदिराजवळ दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे, तरी या भागात जाताना वाहने काळजीपूर्वक चालवावीत व अनावश्यक कारणाने जाण्याचे टाळावे. एकेरी वाहतूक सुरू आहे.

Marathi News Live Update: अजित पवार गटाकडून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर भुजबळ!

अजित पवार गटाकडून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर भुजबळ यांच्या नावाची घोषणा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत निर्णयाची घोषणा होणार आहे.

डोबिंवलीत तुफान पावसाला सुरुवात

डोंबिललीत तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दिवा,डोंबिवली,कल्याण आणि ग्रामीण परिसरात मुसळधार पाऊस. वादळी वारा, ढगाच्या गडगडासह मुसळधार पाऊस. अचानक आभाळ येऊन पाऊस पडायला सुरवात....

मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब लालबाग राजाच्या चरणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे, नातू हेही उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला

अडचणीत असलेल्या बहीणीला मदतीचा हात देणार धनंजय मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या कारखान्यामुळे अडचणीत आल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्याशी कारखान्याबाबत चर्चा करुन शक्य ती मदत करणार असं धनंजय मुंडे म्हणालेत.

अजित पवार सागर बंगल्यात जाताच, गोपीचंद पडळकर मेघदूत बंगल्यातून बाहेर

अजित पवार सागर बंगल्यात जाताच, गोपीचंद पडळकर मेघदूत बंगल्यातून बाहेर पडले. अजित पवार व गोपीचंद पडळकर यांमधील वाद सर्वश्रुत आहे. अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. मेघदूत व सागर हे दोन्ही बंगले एकमेकांना जोडलेले आहेत. पवार व पडाळकरांमधील वाद विकोपाला पोहोचला होता.

शिवसेना आमदार अपात्रतेवर निर्णय देताना दिरंगाई करणार नाही- राहुल नार्वेकर

शिवसेना आमदार अपात्रतेवर निर्णय देताना दिरंगाई करणार नाही, 13 ऑक्टोंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान युक्तीवाद होणार असल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. दोन्ही गटांना विधानसभा अध्यक्षांकडून प्रत पोहचली आहे.

सुप्रीम कोर्टात राज्याच्या विधिमंडळाकडून आजच वेळापत्रक सादर केलं जाण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टात राज्याच्या विधिमंडळाकडून आजच वेळापत्रक सादर केलं जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यात सुनावणीची रूपरेषा सादर करायला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. काल अध्यक्षांनी वेळापत्रक ठरवल्यानंतर आजच ते कोर्टात सादर होणार आहे. 3 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

भारताला मिळालं पाचवं सुवर्णपदक

भारताच्या सिफ्ट साम्राने 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत सुवर्ण पदक आणि आशी चौकसेने कांस्यपदक जिंकले आहे.

राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता

राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. त्या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट; नाशिकमधील दुर्घटना

नाशिकच्या उत्तम नगर मध्ये मोबाईलचा मोठा स्फोट झाला आङे. मोबाईलच्या स्फोटामुळे घरातील काचा फुटल्याचं समोर आलं आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घडली घटना. मोबाईल स्फोटामुळे तीन जण जखमी झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाईल स्फोट एवढा भीषण होता की, आजूबाजूचा घरांच्या देखील फुटल्या काचा फुटल्या आहेत.

मथुरामध्ये भीषण ट्रेन अपघात; ट्रेन रूळ सोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली

उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. शकूर बस्ती येथून येणाऱ्या ईएमयू ट्रेनला मथुरा जंक्शनवर मोठा अपघात झाला. ही ट्रेन अचानक रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर चढली यामुळे हा अपघात झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये प्रवासी उपस्थित नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अपघातानंतर रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ उडाला, लोक घाबरले. रेल्वे प्रशासनाकडून या अपघाताचा तपास केला जात आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर