Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

समाजात तेढ निर्माण होणार नाही, याचा विचार सर्वांनीच करावा- पवार

आमची विचारधारा स्पष्ट आहे. सर्व समाजघटकांनी एकोप्याने नांदावं आणि सर्वांचं प्रश्न सुटले पाहिजेत. आपले अधिकार मागत असताना समाजासमाजात तेढ निर्माण होता कामा नये, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे.

तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन मागे, सरकारला पंधरा दिवसांची मुदत

१४ डिसेंबरपर्यंत सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर पुढची लढाई नागपूरच्या मैदानात होईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. तुपकर यांची सरकारसोबत चर्चा झाली असून पंधरा दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं आहे.

राष्ट्रवादीतील संघर्षावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु

राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी खुद्द शरद पवार उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाडदेखील आयोगात उपस्थित आहेत.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासूनच सुरू होण्याची शक्यता

नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन हे 7 डिसेंबरपासूनच सुरू होण्याची शक्यता आहे. आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना जामीन मंजूर

शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची तब्बल ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी जामीन मंजूर केला आहे.

पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांनी आज न्यायालयात हजर करण्यात आलं, दळवींना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कोणाची? निवडणुक आयोगात आज पुन्हा सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाच याबाबत निवडणुक आयोगात आज पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. सायंकाळी 4 वाजता शरद पवार गटाकडून अपुर्ण राहिलेला युक्तीवाद केला जाणार आहे.

यापुर्वीच्या युक्तिवादात शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर आक्षेप घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नसल्याचा दावा केला आहे. मुळात राष्ट्रवादीमध्ये कोणताही वादविवाद नसताना केवळ सत्तेसाठी अजित पवार यांनी अध्यक्षपदावर हक्क सांगितल्याचा युक्तिवाद मागच्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने केला होता.

ठाकरे गटाने नेते दत्ता दळवी यांना अटक; पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहिर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उबाठा गटाच्या माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पोलिस स्टेशनच्या बाहेर जमले आहेत. खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेतेही दाखल झाले आहेत.

कोकणातून पदवीधर निवडणुकीसाठी मनसे उमेदवार देणार

कोकणातून पदवीधर निवडणुकीसाठी मनसे उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनसेकडून अभिजीत पानसे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अभिजीत पानसे यांचा शिक्षण क्षेत्रात चांगला अभ्यास आहे. अभिजीत पानसे यांनी यापूर्वी शाळेतील अनेक समस्या मांडल्या आहे. अभिजीत पानसे कोकणात पदवीधर निवडणुकी संदर्भात कोकण, उल्हासनगर, ठाणे भागात बैठक घेतल्या आहेत. कोकण पदवीधर निवडणुकीत भाजप, ठाकरे गट आणि मनसेत लढत होण्याची शक्यता आहे.

इंदूर-पुणे महामार्गावरील शहरातून कॅम्प भागाला जोडणारा जुना रेल्वे ओव्हर ब्रिज कोसळला

मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्गवरील ब्रिटिश कालीन शहरातून कॅम्प भागाला जोडणारा जुना रेल्वे ओव्हर ब्रिज मध्यरात्री खचला असून पहाटे पाच वाजता काही भाग कोसळला. दोन्ही बाजूकडील संपूर्ण वाहतूक ठप्प आहे. कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र धुळे शिर्डी मार्गावरील हाच एक रेल्वेवरील प्रमुख ब्रिज असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यताआहे.

राज्यात अनेक भागात आज पावसाचा अंदाज तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात अनेक भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज दिवसभरात विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह बीड जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील काही भागांत आजही पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, राष्ट्रवादी कोणाची? यावर निवडणुक आयोगात बुधवारपासून सुनावणी, शिवसेना कोणाची? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सलग पाच दिवस सुनावणी होणार आहे. देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com