Marathi News Update: देश अन् महाराष्ट्रातील सर्व बातम्या एका क्लिकवर वाचा...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स
Marathi News Updates
Marathi News UpdatesEsakal

मोदींनी उज्ज्वला लाभार्थी मीरा मांझी यांच्या कुटुंबासाठी पाठवल्या भेटवस्तू

पंतप्रधान मोदींनी उज्ज्वला लाभार्थी मीरा मांझी यांना पत्र लिहून तिच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी भेटवस्तू पाठवल्या. 30 डिसेंबर रोजी अयोध्या दौऱ्यात पंतप्रधानांनी त्यांच्या घरी भेट दिली होती

Ram Kadam : 22 जानेवारीला संपूर्ण राज्यात दारू  अन् मांस विक्रीवर बंदी घाला -  राम कदम

"अयोध्येत 450 वर्षांनंतर प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक होत आहे. 22 जानेवारी हा करोडो रामभक्तांसाठी पवित्र दिवस आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की 22 जानेवारीला संपूर्ण राज्यात दारू आणि मांस विक्रीवर बंदी घालावी, तसेच केंद्राला देखील विनंती करा,” असे भाजप आमदार राम कदम यांनी सांगितले.

india alliance: इंडिया आघाडीत प्रादेशिक पक्ष काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत

काँग्रेसला वगळता इंडिया आघाडीत व्हर्च्युअल बैठक झाल्याची चर्चा आहे. प्रादेशिक पक्ष काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे, नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांची फोनवर चर्चा झाली आहे. नितीश कुमार यांना संयोजक म्हणून सर्वांची संमती असल्याची माहिती आहे.

Yogi Adityanath: फक्त एकच धर्म आहे अन् तो म्हणजे सनातन धर्म - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात, "फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे सनातन धर्म ज्याने प्रत्येक देशात, प्रत्येक वेळी, प्रत्येक परिस्थितीत आपले चैतन्य टिकवून ठेवले आहे... सनातन धर्म सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देत आपला प्रवास सुरू ठेवतो..."

ओबीसी विरोधातील याचिकेवर ७ फेब्रुवारीला सुनावणी

ओबीसी आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली असून ७ फेब्रुवारीला त्यावर सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आलाय.

मंत्री दीपक केसरकर अंगणवाडी सेविकांच्या भेटीला

मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु आहे. काही वेळापूर्वी या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली होती. आता मंत्री दीपक केसरकर आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

आमदार अपात्रतेप्रकरणी उद्या सुनावणी

आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

अंगणवाडी सेविका रामभक्त नाहीत का?- उद्धव ठाकरे

मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये राज्यातील अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रासह राज्य सरकारवर आसूड ओढला. अंगणवाडी सेविका रामभक्त नाहीत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे आझाद मैदानात

अंगणवाडी सेविकांचे आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानात दाखल झाले आहेत.

आझाद मैदानाबाहेर अंगणवाडी सेविकांची घोषणाबाजी

आझाद मैदानाबाहेरील रस्त्यावर अंगणवाडी सेविकांनी घोषणाबाजी करीत ठिय्या मांडला आहे. विविध मागण्यांसाठी आंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.

सायन-धारावी पूल पाडण्याच्या कामाला बीएमसीची परवानगी

BMC- सायन-धारावी पूल पाडण्याच्या कामाला महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. ४ जानेवारीपासून हा पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.

उद्या पुण्यात पार पडणार मागासवर्ग आयोगाची बैठक

मागासवर्गाची आयोगाची बैठक उद्या पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी पार पडणार आहे.

Dahanu:डहाणूमधील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

Dhahanu Earthquake: डहाणूमधील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

मराठ्यांची पोरं IAS-IPS झालेली पाहिल्याशिवाय आता थांबणार नाही- जरांगे पाटील

मराठ्यांची पोरं IAS-IPS झालेली पाहिल्याशिवाय आता थांबणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील यांची मराठा समन्वयकांनी आज भेट घेतली आहे

Nawab Malik: नवाब मलिकांच्या जामिनाला मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार

नवाब मलिकांच्या जामिनाला मुदतवाढ देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला कोर्टाने दिला आहे.

जंतर-मंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन

दिल्लीतील जंतर मंतरवर कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केले आहे. बजरंग पिनिया, साक्षी मलिक यांनी कुस्तीला बदनाम केल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे.

Driver Protest: वाहतूकदारांच्या संपामुळे राज्याला ५०० कोटींचा फटका

वाहतूकदारांच्या संपामुळे राज्याला ५०० कोटींचा फटका बसल्याचा दावा करण्यात आला आहे. हिट अँड रन कायद्यावरुन वाहतूकदारांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता. त्यानंतर आज संप मागे घेण्यात आला आहे.

आसामच्या गोलाघाटमधील अपघात प्रकरणी पंतप्रधान-राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

आसामच्या गोलाघाट येथे झालेल्या रस्ते अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख जाहीर करण्यात आलेत.

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बिल्डरकडून बळकवण्याचा डाव- आदित्य ठाकरे

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बळकावण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. काही जागा रेससाठी आणि काही जागेवर हॉटेल उभारण्याचा डाव असल्याचं ते म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांकडून साताऱ्यात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. छगन भुजबळ हे देखील उपस्थिती होते.

हिंडेनबर्ग वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अदानींचा प्रतिक्रिया

अब्जाधीश गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली, सत्याचा विजय झाला - 'सत्यमेव जयते'

अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची गरज नाही - सर्वोच्च न्यायालय

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात एसआयटी तपासाला नकार देत सेबी चौकशी नियमांनुसार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय अहवालाच्या चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत असेही कोर्टाने म्हटले आहे.

याबाबतीत जर जाणून-बुजून नियमांचे उल्लंघन झालं असेल तर कायदेशीर कारवाई व्हायला हवी असे मत कोर्टाने व्यक्त केलं, सेबीच्या तपासामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार नाही असेही सांगण्यात आले. उरलेल्या दोन केसबाबत तपास करण्यासाठी सेबीला सुप्रीम कोर्टाकडून 2 महिन्यांची वेळ देण्यात आला आहे.

Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार - तटकरे

आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. येत्या १४ जानेवारीपासून सर्व जिल्ह्यात महायुतीचे मेळावे घेणार असल्याचे देखील तटकरे म्हणाले. महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येत आहे, यामध्ये दादा भुसे, सुनिल तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मेळावे घेतले जाणार आहेत.

गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी NIAचे हरियाणा, राजस्थानमध्ये 31 ठिकाणी शोध

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा हरियाणा आणि राजस्थानमध्ये 31 ठिकाणी शोध घेत आहे.

शिर्डीतील शिबीरासाठी शरद पवार दाखल; राज्यातील जिल्हाध्यक्षांना निमंत्रण

शिर्डीतील शिबीरासाठी शरद पवार दाखल झाले आहेत. या शिबीरासाठी राज्यातील जिल्हाध्यक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे. हे शिबीर २ दिवस चालणार आहे.

दिल्लीतील बवाना येथे भीषण आग, 25 अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील बवाना इंडस्ट्रियल एरियातील एका कारखान्यात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाने अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षेसाठी स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान बराच वेळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीवर अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळालेले नाही. सध्या या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

धुक्यामुळे दिल्ली परिसरात २६ ट्रेन उशिराने

धुक्यामुळे दिल्ली परिसरात २६ ट्रेन उशिराने धावत असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे, त्याचबरोबर दाट धुक्यांचीचादर पसरली आहे. त्याचा फटका रेल्वे आणि विमान उड्डाणांना बसला आहे.

अंतरवालीमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

अंतरवाली सराटीमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारकडून CAA कायदा लागू करण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारकडून CAA कायदा लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डिसेंबर 2019 मध्ये CAA म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा विषयीचे विधेयक संसदेने मंजूर केले होते. या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. पण मुस्लीम लोकांचा यात समावेश करण्यात आलेला नाहीये.

धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल, असं भाजप सरकारनं म्हटलं आहे. पण, हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

आसामच्या गोलाघाट ट्रकने बसला धडक दिल्याने भीषण अपघात, १२ प्रवाशांचा मृत्यू; २५ जण जखमी

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी सकाळी प्रवासी बस आणि ट्रकच्या धडकेत पाच महिला आणि एका अल्पवयीन मुलासह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना राष्ट्रीय महामार्ग 37 वरील डेरगाव येथे पहाटे 5 वाजता घडली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची महत्वाची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडणार आहे. पक्षाचे महासचिव आणि सर्व राज्यांचे प्रभारी यांची पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाची राज्यात काय स्थिती यावर चर्चा होणार आहे. इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढताना पक्षाने किती जागा लढव्यात यावर चर्चा होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस च्या निवडणूक कमिटीने त्या त्या राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. सोबतच राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेवर देखिल बैठकीत चर्चा होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED कडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED कडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ED कडून समन्स पाठवण्यात आले आहे. केजरीवाल यांना ED कडून हे तिसरं समन्स पाठवलं आहे. यापूर्वी दोन्ही समन्सनंतर केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नव्हते उलट त्यांनी ED ला पत्र लिहून ही राजकीय सुडापोटी कारवाई असल्याचं म्हटलं होतं.आज केजरीवाल चौकशीला जाणार की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. पक्षाची कायदेशीर टीम यावर चर्चा करत असल्याचं आपकडून सांगण्यात आलं आहे.

‘राष्ट्रवादी’बाबत उद्यापासून सुनावणी; विधिमंडळ सचिवालयाने नोटीस केली जारी

पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची चौकशी चार जानेवारी रोजी सुरू होणार आहे. विधिमंडळ सचिवालयाने यासंदर्भातील नोटीस जारी केली असून, दोन्ही बाजूंच्या आमदारांनी बाजू मांडण्यासाठी चार जानेवारीला हजर राहावे, असे कळवण्यात आले आहे. ‘राष्ट्रवादी’बाबतचा निकाल ३१ जानेवारीपर्यंत लावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. शिवसेनेतील फुटीबाबत १० जानेवारीच्या आत निर्णय द्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निर्णय देणे ३१ डिसेंबरपर्यंत शक्य नसल्याने विधिमंडळाच्या अध्यक्षांनी मुदतवाढ मागितली होती.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193 वी जयंती त्यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यात आहेत. उत्तर भारतात थंडीची लाट आहे, तर काही राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या आणि विमान उड्डाणे रद्द आणि विलंबाने सुरू आहेत, देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com