धक्कादायक : लॉकडाउन काळात राज्यात 335 पोलिसांवर हल्ला

टीम ई-सकाळ
Sunday, 23 August 2020

राज्यात २२ मार्च ते २१ ऑगस्ट दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी 7 लाख 73 हजार 409 पास पोलिसांमार्फत देण्यात आले होते. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोलिसांमार्फत सूट दिली होती.

मुंबई : कोरोना अटोक्यात येण्यासाठी महाराष्ट्र Maharashtra सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. पण वारंवार सूचना देऊनही लोक ऐकत नाहीत. त्यामळे लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 32 हजार 584 गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत 33 हजार 719 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 22 कोटी 02 लाख 23 हजार 994 रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती काल गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी दिली. 

पुण्यातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात २२ मार्च ते २१ ऑगस्ट दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी 7 लाख 73 हजार 409 पास पोलिसांमार्फत देण्यात आले होते. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोलिसांमार्फत सूट दिली होती. गंभीर बाब म्हणजे याकाळात 335 पोलिसांवर हल्ला झाला आहे. त्याबद्दल 890 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलं आहे. तसेच याकाळात 1 लाख 10 हजार 818 फोन पोलिसांची हेल्पलाइन असलेल्या '100' नंबरवर आले होते. कोरोनाच्या भीतीमुळे राज्यात बरंच भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भीतीमुळं राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine)असा शिक्का मारला होता, असे बरेच लोक विलगीकरण कक्षातून पळून गेले होते. अशा 829 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याकाळात अवैध वाहतूक करणाऱ्यांवरही पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यादरम्यान 1347 वाहनांवर दाखल गुन्हे दाखल केली असून 95 हजार 944 वाहने जप्त केली आहेत. महाराष्ट्रात सध्या 311 पोलीस अधिकारी आणि 2167 पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra lockdown 335 cases of attack on police person