Lok Sabha Election 2024 Voting : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत आज 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
Lok Sabha Election 2024 Voting LIVE
Lok Sabha Election 2024 Voting LIVEeSakal

महाराष्ट्रातील आठ मतदारसंघातील आकडेवारी

वर्धा - ५६.६६ टक्के

वाशिम-यवतमाळ - ५४.०४ टक्के

अमरावती - ५४.५० टक्के

अकोला - ५२.४९ टक्के

बुलडाणा - ५२.८८ टक्के

हिंगोली - ५२.०२ टक्के

परभणी - ५३.७९ टक्के

नांदेड - ५३.५३ टक्के

एकूण- ५३.७१ टक्के

वर्ध्यात सर्वाधिक मतदान, राज्यात ५३.७१ टक्के वोटिंग

महाराष्ट्रात आठ मतदारसंघात 53.71 इतके टक्के मतदान झालं. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 56.66 टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.

आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वर्धा - ५६.६६ टक्के

अकोला -५२.४९ टक्के

अमरावती - ५४.५० टक्के

बुलढाणा - ५२.२४ टक्के

हिंगोली - ५२.०३ टक्के

नांदेड - ५२.४७ टक्के

परभणी -५३.७९ टक्के

यवतमाळ - वाशिम -५४.०४ टक्के

यवतमाळ-वाशिममध्ये ५४.४ टक्ते मतदान

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 5 वाजतापर्यंत 54.04 टक्के मतदान झाले.

सकाळी 7 ते 5 वाजता दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

दिग्रस : 57.06 टक्के

कारंजा : 50.41 टक्के

पुसद : 53.18 टक्के

राळेगाव : 61.50 टक्के

वाशिम : 53.81 टक्के

यवतमाळ : 49.46 टक्के

तुरळक घटना वगळता अमरावतीमध्ये शांततेत मतदान

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता.२६) मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी मशीनमध्ये झालेले बिघाड तसेच अन्य कारणांनी मतदानाला उशीर झाला असला तरी नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. ढगाळ वातावरण व काल काही प्रमाणात आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा आल्याने सकाळच्या वेळी मतदानाने चांगलाच वेग घेतला होता. ३७ उमेदवार अमरावतीच्या रिंगणात असून तिहेरी लढत होण्याचे संकेत आहेत. महिला, तरुण तसेच नवमतदारांमध्ये सुद्धा उत्साह दिसून आला. मेळघाटच्या पाच गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने तेथे मतदान झाले नाही. तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. एकूण १,९८३ मतदानकेंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली.

मध्य प्रदेशात ४६.५० टक्के मतदान

मध्य प्रदेशात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.50 टक्के मतदान झाले आहे.

नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम फोडले

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने कुऱ्हाडीने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याची धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

Akola Lok Sabha Voting : बुलडाणा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 41.66 टक्के मतदान

बुलडाणा- 34.72 टक्के

चिखली- 43.78 टक्के

जळगाव जमोद- 39.46 टक्के

खामगाव- 42.88 टक्के

मेहकर-46.88 टक्के

सिंदखेडराजा- 42.15 टक्के

 Akola Lok Sabha Voting : अकोल्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ४२.६९ टक्के मतदान

लोकसभा निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात अकोल मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४२.६९ टक्के मतदान झाले.

 Lok Sabha Voting 2nd Phase : दर्यापूर येथील केंद्रावर मतदान करताना बळवंत वानखडे 

अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी दर्यापूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला

Lok Sabha Voting 2nd Phase Live Update : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्पासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्पासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

आसाम 46.31%

बिहार 33.80%

छत्तीसगढ 53.09%

जम्मू आणि काश्मीर 42.88%

कर्नाटक 38.23%

केरळ 39.26%

मध्य प्रदेश 38% 26.74%

राजपुर 38% .39%

त्रिपुरा 54.47%

उत्तर प्रदेश 35.73 %

पश्चिम बंगाल 47.29%

Tripura Voting LIVE : त्रिपुरामध्ये ब्रु जमातीने कित्येक वर्षांनी केलं मतदान 

त्रिपुरामधील ब्रु समुदायाने सुमारे 26 वर्षांनंतर या निवडणुकांमध्ये मतदान केलं. जातीय हिंसाचारामुळे ब्रु समुदायाने मिझोराम क्षेत्र सोडून त्रिपुरामध्ये आसरा घेतला होता. यानंतर त्यांना कित्येक वर्षे मतदान करता आलं नव्हतं. आता या सुमदायाला यावर्षी पुन्हा मतदान करता आलं आहे.

Bihar Voting LIVE : लग्न करून नववधू थेट पोहोचली मतदानाला

बिहारमधील एक नववधू आपल्या लग्नानंतर थेट मतदान केंद्रावर पोहोचली. मतदानाचा हक्क बजावणं किती महत्त्वाचं आहे असा संदेश तिने आपल्या कृतीतून दिला.

Bagheshwar Dham : बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींनी केलं मतदान 

बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांनी आज खजुराहोमध्ये मतदान केलं. हा लोकशाहीचा उत्सव असून, त्यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकांनी सहभाग घ्यावा असं ते म्हणाले. 'पहले मतदान, फिर जलपान' असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.

Lok Sabha Voting 2nd Phase Live Update : दुपारी एक वाजेपर्यंत मणिपूरमध्ये 53 टक्के मतदान; इतर राज्यांमध्ये काय आकडेवारी?

कोणत्या राज्यात किती मतदान? दुपारी एक वाजेपर्यंतची आकडेवारी

 • आसाम - 46.31%

 • बिहार - 33.80%

 • छत्तीसगड - 53.09%

 • जम्मू-काश्मीर - 42.88%

 • कर्नाटक - 38.23%

 • केरळ - 39.26%

 • मध्य प्रदेश - 38.96%

 • महाराष्ट्र - 31.77%

 • मणिपूर - 54.26%

 • राजस्थान - 40.39%

 • त्रिपुरा - 54.47%

 • उत्तर प्रदेश - 35.73%

Yavatmal-Washim Lok Sabha LIVE Update : यवतमाळ वाशिम मतदान टक्केवारी

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 1 वाजतापर्यंत 31.47 टक्के मतदान झाले.

सकाळी 7 ते 1वाजता दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

दिग्रस : 34.45%

कारंजा : 31%

पुसद : 31.43%

राळेगाव : 35.85%

वाशिम : 33.30%

यवतमाळ :23.86%

वर्ध्यामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३२ टक्के मतदान तर बुलढाण्यात २९.०७ टक्के मतदानाची नोंद

वर्ध्यामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३२ टक्के मतदान तर बुलढाण्यात  २९.०७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. 

जिंतूरमध्ये वर-वधूने विवाहापूर्वी बजावला मतदानाचा हक्क

जिंतूर, तालुक्यातील देवसडी येथील वर श्रीकांत आणि नववधू अल्का यांनी विवाहबंधनात अडकण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला.

Wardha Lok Sabha LIVE : सव्वादोन तासांनंतर वर्ध्यात मतदान सुरू

वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यात असणाऱ्या चानकी (कोरडे) येथे सकाळी दहाच्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद पडली होती. सुमारे सव्वादोन तासांनी याठिकाणी मतदान सुरू झालं. मशीन बंद पडण्यापूर्वी 118 नागरिकांनी मतदान केलं होतं. याठिकाणी एकूण 1,178 मतदार आहेत. मशीन सुरू झाल्यानंतर मतदारांनी केंद्रावर गर्दी केली आहे.

यासोबतच हिंगोलीमध्ये देखील मतदान प्रक्रिया सुरळीत झाली आहे.

Tripura Lok Sabha LIVE : त्रिपुरामध्ये सर्वाधिक मतदान, नागरिक बोटीने पोहोचतायत मतदानाला..

देशात सकाळी 11 वाजेपर्यंत त्रिपुरामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं पहायला मिळालं. याठिकाणी ढलाई या दुर्गम जिल्ह्यातील गावांमध्ये रस्ते नसतानाही लोक बोटीने मतदानाला आलेले दिसत आहे.

Shiv Thakeray : बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेने केलं मतदान

मराठी बिग बॉस विजेता अभिनेता शिव ठाकरेने देखील आज मतदानाचा हक्क बजावला.

Parbhani Lok Sabha LIVE : बलसा खुर्द गावातील बहिष्कार मागे, मतदान प्रक्रियेला सुरुवात

परभणीतील बलसा खुर्द गावातील नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः त्याठिकाणी पोहोचले होते. यानंतर बराच काळ चर्चा झाली. यानंतर गावकऱ्यांनी बहिष्कार मागे घेतला असून, मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे.

Kerala Lok Sabha Voting LIVE : एस. सोमनाथ अन् नम्बी नारायण यांचाही लोकशाहीच्या उत्सवात सहभाग

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ हे मतदानासाठी रांगेत उभे आहेत. तर इस्रोचे माजी वैज्ञानिक नम्बी नारायण यांनी केरळच्या तरुण नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. केरळमध्ये आज सर्व जागांसाठी मतदान पार पडत आहे.

Lok Sabha Voting 2nd Phase LIVE : सकाळी 11 वाजेपर्यंत  कोणत्या राज्यात किती झालं मतदान?

कोणत्या राज्यात किती मतदान?

 • त्रिपुरा - 36.42%

 • छत्तीसगड - 35.47%

 • मणिपूर - 33.22%

 • पश्चिम बंगाल - 31.25%

 • मध्य प्रदेश - 28.15%

 • आसाम - 27.43%

 • राजस्थान - 26.84%

 • जम्मू-काश्मीर - 26.61%

 • केरळ - 25.61%

 • उत्तर प्रदेश - 24.31%

 • कर्नाटक - 22.34%

 • बिहार - 21.68%

 • महाराष्ट्र - 18.83%

Yavatmal-Washim Lok Sabha Update LIVE : यवतमाळ वाशिम मतदान टक्केवारी

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजतापर्यंत 18.01 टक्के मतदान झाले.

सकाळी 7 ते 11 वाजता दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

 • दिग्रस : 20.22

 • कारंजा : 27.22

 • पुसद : 18.69

 • राळेगाव : 20.85

 • वाशिम : 20.26

 • यवतमाळ : 11.56

Lok Sabha Voting 2nd Phase LIVE : राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.83 टक्के मतदानाची नोंद

महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

 • परभणी - 21.77 टक्के मतदान

 • बुलढाणा - 17.92 टक्के मतदान

 • यवतमाळ-वाशिम - 18.01 टक्के मतदान

 • नांदेड - 20.85 टक्के मतदान

 • अकोला - 17.37 टक्के मतदान

 • वर्धा - 18.35 टक्के मतदान

 • अमरावती - 17.73 टक्के मतदान

 • हिंगोली - 18.19 टक्के मतदान

Parbhani Lok Sabha Voting LIVE : बलसा खुर्दमध्ये मतदानावर बहिष्कार, गावकऱ्यांचं मन वळवण्यासाठी जिल्हाधिकारी दाखल

परभणीतील बलसा खुर्द गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे या गावात सकाळपासून एकही मतदान झालेलं नाही. याठिकाणी आता गावकऱ्यांचं मन वळवण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः दाखल झाले आहेत.

Shashi Tharoor : काँग्रेस नेते शशी थरूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही रिस्टोअर करण्यासाठी, आणि देशातील विविधतेसाठी हे मत असल्याचं ते म्हणाले. केरळमध्ये आज सर्व जागांवर मतदान पार पडत आहे.

Lok Sabha Voting LIVE : अकोल्यातील शेकडो कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार

अकोल्यातील बिर्ला कॉलनीत राहणाऱ्या शेकडो कुटुंबांनी आज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. बिर्ला कॉलनीतील नागरिकांना घर खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे, या विरोधात मतदानावर बहिष्कार टाकल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.

Navneet Rana : नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने मतदानाचा हक्क बजावला

नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनी अमरावतीत मतदानाचा हक्क बजावला. दुचाकीवरुन बसून हे दोघे मतदान केंद्रावर दाखल झाले होते.

Lok Sabha Voting LIVE : यवतमाळ-वाशिम लोकसभा अपडेट

जिल्हाधिकारी डॉ. पकंज आशिया यांनी सपत्निक बजावला मतदानाचा हक्क.

जिल्हाधिकारी डॉ. पकंज आशिया
जिल्हाधिकारी डॉ. पकंज आशियाeSakal

Manipur Lok Sabha LIVE : मणिपूरमध्ये दिव्यांग तरुणीने केलं मतदान

मणिपूरमध्ये एका दिव्यांग तरुणीने मतदान केलं आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरू आहे.

Lok Sabha Election LIVE Updates : नोएडामध्ये मतदारांच्या मदतीसाठी इलेक्ट्रिक व्हेईकलची सुविधा

नोएडामधील सेक्टर 15A मध्ये मतदारांच्या सुविधेसाठी इलेक्ट्रिक गाड्यांची सोय करण्यात आली आहे. मतदारांना आपल्या घरुन पिक करुन मोफत मतदान केंद्रापर्यंत नेलं जात आहे.

Navneet Rana : हनुमान चालिसा वाचून मतदानाला आले, नवनीत राणांची माहिती

भाजप उमेदवार नवनीत राणा आणि खासदार रवी राणा हे मतदानासाठी रवाना झाले आहेत. मतदान करण्यापूर्वी आपण सकाळी हनुमान चालिसाचे पठण केल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं. सोबतच घरातील मोठ्यांचा आशीर्वादही घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी बजावला मतदानाचा हक्क; रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर दाखल 

मनोज जरांगे पाटील यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर जात त्यांनी मतदान केलं.

Lok Sabha Voting 2nd Phase Live : देशात कोणत्या राज्यात किती मतदान?

देशात दुसऱ्या टप्प्याच्या 88 जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झालं आहे -

 • आसाम - 9.71 टक्के

 • बिहार - 9.84 टक्के

 • छत्तीसगढ - 15.42 टक्के

 • जम्मू आणि कश्मीर - 10.39 टक्के

 • कर्नाटक - 9.21 टक्के

 • केरळ - 11.98 टक्के

 • मध्यप्रदेश - 13.82 टक्के

 • महाराष्ट्र - 7.45 टक्के

 • राजस्थान - 11.77 टक्के

 • त्रिपुरा - 16.65 टक्के

 • उत्तर प्रदेश - 11.67 टक्के

 • पश्चिम बंगाल - 15.68 टक्के

Lok Sabha Voting LIVE : अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ६.८३ टक्के मतदान

लोकसभा सार्वत्रिक लोकसभा मतदान २०२४

अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ६.८३ टक्के मतदान पार पडले.

लोकसभा मतदारसंघनिहाय मतदान

 • ०५- बुलडाणा -६.६१ %

 • ०६- अकोला -७.१७ %

 • ०७- अमरावती -६.३४ %

 • १४- यवतमाळ-वाशिम ७.२३ %

Parbhani Lok Sabha Voting LIVE : ज्या लोकांनी मला बाहेरचं ठरवलं त्यांना जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल- महादेव जानकर

महादेव जानकर- ''लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेळ कमी असल्यामुळे मी गाडीतच जेवन करत आहे. मला पाणी पिण्यासाठीही वेळ नाही. ज्या लोकांनी मला बाहेरचं ठरवलं त्यांना जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल.''

Amravati Lok Sabha Voting LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा जे काम करत आहे त्याबद्दल मी सकारात्मक- नवनीत राणा

अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा म्हणाल्या, "तुम्ही माझा चेहरा पाहू शकता. तो सकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा जे काम करत आहे त्याबद्दल मी सकारात्मक आहे "

Parbhani Lok Sabha Voting LIVE : परभणीतील गावाचा मतदानावर बहिष्कार

परभणीमधील बलसा खुर्द गावाने मतदानावर बहिष्कार टाकल्याचं समोर येत आहे. अतिक्रमणाच्या समस्येबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे या गावाने मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान कर्मचारी सकाळपासून केंद्रावर हजर आहेत, मात्र मतदानासाठी कोणीही पुढे येत नसल्याचं चित्र आहे.

Lok Sabha Voting 2nd Phase Live : अशोक चव्हाणांनी केलं मतदान

भाजप नेते अशोक चव्हाणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांना देखील मतदान करण्याचं आवाहन केलं. दुपारी उन्हामुळे मतदानाला येण्यास अडचण होऊ शकते, त्यामुळे सकाळच्या वेळेतच येऊन मतदान करा असं ते म्हणाले.

Lok Sabha Voting LIVE : अभिनेत्री हेमा मालिनी अन् नेहा शर्माने केलं मतदान 

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि नेहा शर्माने मतदानाचा हक्क बजावला. हेमा मालिनी या स्वतः निवडणुकीला उभ्या आहेत. तर नेहा शर्मा यांचे वडील अजीत शर्मा हे काँग्रेसकडून उमेदवार आहेत.

Lok Sabha Voting 2nd Phase LIVE : राज्यात नऊ वाजेपर्यंत 7.45 टक्के मतदान

महाराष्ट्रात आज सकाळपासून 9 वाजेपर्यंत एकूण 7.45 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

 • परभणी -- 9.72 टक्के मतदान

 • बुलढाणा - 6.61 टक्के मतदान

 • यवतमाळ-वाशिम - 7.23 टक्के मतदान

 • नांदेड - 7.73 टक्के मतदान

 • अकोला - 7.17 टक्के मतदान

 • वर्धा - 7.18 टक्के मतदान

 • अमरावती - 6.34 टक्के मतदान

 • हिंगोली - 6.23 टक्के मतदान

Anil Kumble : अनिल कुंबळेने बजावला मतदानाचा हक्क

भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे याने मतदानाचा हक्क बजावला आहे. बंगळुरूमध्ये त्याने मतदान केलं.

Anil Kumble
Anil KumbleeSakal

Manipur Lok Sabha : सुरक्षा बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरू

मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आणि लष्कराच्या देखरेखीखाली शांततेत मतदान पार पडत आहे.

Rahul Dravid : राहुल द्रविडने बजावला मतदानाचा हक्क

भारतीय क्रिकेट संघाचा कोच राहुल द्रविडने मतदानाचा हक्क बजावला. बंगळुरूमध्ये त्याने मतदान केलं. यावेळी त्याने नागरिकांना बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन देखील केलं.

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या.

Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांनी केलं मतदान

आमदार संतोष बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर केंद्रावरच त्यांनी जय श्रीराम अशा घोषणाही दिल्या.

Lok Sabha Election Phase 2 : ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

नांदेडमध्ये सुमारे दीड तासांपासून मतदान यंत्र बंद असल्याची माहिती मिळत आहे. सावरगाव निपाणी या गावामधील हा प्रकार आहे. यामुळे सध्या मतदान प्रक्रिया थांबल्याचं समजत आहे. साम टीव्हीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

Amaravati Lok Sabha : अमरावतीमध्ये आणखी एक नवरदेव मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा हक्क

अमरावतीमध्ये आणखी एका नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला आहे. शेरवानी, फेटा आणि मुंडावळ्या अशा पेहरावातच हा नवरदेव मतदान केंद्रावर हजर झाला होता.

Akola Lok Sabha : अकोल्यामध्येही नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वर - राहुल महादेवराव सोळंके (रा.दहिगाव) याचे सरपंच रविकिरण काकड, पोलीस पाटील अरविंद अवताडे तलाठी संदीप ढोक यांनी स्वागत केले.

Akola Lok Sabha Voting
Akola Lok Sabha VotingeSakal

EVM Machine Fault : ग्रेटर नोएडमध्ये देखील ईव्हीएममध्ये बिघाड

गौतम बुद्ध नगरच्या ग्रेटर नोएडामधील दोन बूथवर ईव्हीएम मशीन खराब झाल्याचं सांगण्यात येत आहे. 1 आणि 7 नंबरच्या बूथवर बऱ्याच वेळापासून मतदान थांबल्याचं समाजवादी पक्षाने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडूंनी बजावला मतदानाचा हक्क

अमरावतीमध्ये बच्चू कडूंनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Rahul Gandhi : राहुल गांधींनी केलं मतदानाचं आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तुमचं एक मत हे ठरवेल की पुढचं सरकार ठराविक अब्जाधीशांचं असेल, की 140 कोटी भारतीयांचं, असं म्हणत त्यांनी नागरिकांना आपलं मतदानाचं कर्तव्य पूर्ण करण्याचं आवाहन केलं.

Kerala Lok Sabha : केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केलं मतदान

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मतदानाचा हक्क बाजवला. कन्नूरमध्ये त्यांनी मतदान केलं. केरळमध्ये आज सर्व 20 जागांवर मतदान पार पडत आहे.

Prakash Raj Vote : अभिनेते प्रकाश राज यांनी बजावला मतदानाचा हक्क

अभिनेते प्रकाश राज यांनी बंगळुरूमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. तुमचा उमेदवार हा तुमचा लोकप्रतिनिधी आहे. हा संसदेत तुमचे प्रश्न मांडणार आहे. त्यामुळे नीट विचार करून मतदान करा, असं ते यावेळी म्हणाले. कर्नाटकमध्ये आज 14 जागांवर मतदान पार पडत आहे.

Amaravati Lok Sabha : अमरावतीमध्ये नवरदेव थेट आला मतदानाला

अमरावतीमधील वडरपुरा येथे सकाळपासूनच मतदानासाठी उत्साह दिसत आहे. एक नवरदेव आपल्या लग्नापूर्वी मतदान करण्यासाठी याठिकाणी आल्याचं पहायला मिळालं. लग्न महत्त्वाचं आहे, मात्र मतदान त्याहून महत्त्वाचं असल्याचं आकाश म्हणाला.

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं मतदान

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. बंगळुरूमध्ये त्यांनी मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वडील देखील उपस्थित होते.

Wardha Lok Sabha Voting : वर्ध्यात अखेर मतदान सुरू

वर्ध्यातील देवळी येथे ईव्हीएम मशीन बिघडल्यामुळे मतदान थांबलं होतं. अखेर, अधिकाऱ्यांनी मशीन पुन्हा सुरू केल्यानंतर मतदानास देखील सुरुवात झाली आहे.

Amaravati Lok Sabha : अमरावतीमध्येही EVM मशीनमध्ये बिघाड, मतदान 15 मिनिटे थांबलं

अमरावतीच्या वडरपुरा भागातील मतदान केंद्रावर देखील EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर येत आहे. सुमारे 15 मिनिटे ही मशीन बंद होती. यानंतर अधिकाऱ्यांनी मशीन सुरू केली.

Wardha Lok Sabha : वर्ध्याच्या देवळी येथे EVM मशीन बंद

वर्ध्याच्या देवळी येथे EVM मशीन बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली आहे. मशीनच बंद पडल्यामुळे कोणीही मतदान करू शकलेलं नाही.

PM Modi Voting : पंतप्रधान मोदींनी केलं मतदानाचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. जेवढं जास्त मतदान कराल, तेवढीच आपली लोकशाही मजबूत होईल, अशी पोस्ट त्यांनी आपल्या एक्स हँडलवरुन केली. देशातील स्त्रीशक्तीने मोठ्या प्रमाणात मतदान करावं असंही ते म्हटले.

Sudha Murti Vote : सुधा मूर्तींनी बजावला मतदानाचा हक्क

लेखिका सुधा मूर्ती यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. बंगळुरूमध्ये त्यांनी मतदान केलं. यावेळी त्यांनी नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं.

Maharashtra Lok Sabha 2024 : राज्यातील आठही मतदारसंघांमध्ये मतदान सुरू

महाराष्ट्रातील आठही मतदारसंघांमध्ये मतदानास सुरुवात झाली आहे. बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी सातपासूनच नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. तरुणांसोबतच वयोवृद्ध नागरिक देखील मतदानासाठी उपस्थित असल्याचं दिसतंय.

Lok Sabha Voting Phase 2 : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दुसरा टप्पा सुरू

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. देशातील 88 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे.

Manipur Lok Sabha : मणिपूरमध्ये 94 वर्षांच्या आजी मतदानाला हजर

हिंसाचारामुळे चर्चेत असलेल्या आउटर मणिपूर मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. याठिकाणी सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वीच 94 वर्षांच्या आजी मतदानासाठी हजर असल्याचं पहायला मिळालं.

Lok Sabha Voting Phase 2 : मतदान केंद्रांबाहेर नागरिकांच्या रांगा

देशातील 88 मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल. आपला हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडत आहेत. सकाळी सहा-साडेसहा वाजेपासूनच मतदान केंद्रांबाहेर नागरिकांच्या रांगा पहायला मिळत आहेत.

Lok Sabha Elections : मतदारांसाठी पंखे-पाण्याची सोय.. मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून यासाठी तयारी करत आहोत. मतदान केंद्रांवर पाणी, पंखे अशा गोष्टींची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी केवळ घरातून बाहेर पडून आपला हक्क बजावावा असं ते म्हणाले.

Lok Sabha Voting 2nd Phase : मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण, मॉक व्होटिंगही सुरळीत

देशात ठिकठिकाणी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवरील तयारी पूर्ण झाली असून, कित्येक ठिकाणी मॉक व्होटिंगही सुरळीत पार पडलं आहे.

Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील या लढतींकडे लक्ष

यवतमाळमध्ये थेट लढत

यवतमाळ-वाशीम मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय देशमुख आणि शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

अकोल्याच्या लढतीकडे राज्याचं लक्ष

अकोल्यामध्ये भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत आहे.

अमरावतीत तिरंगी

अमरावतीत नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बूब यांच्यात तिरंगी लढत आहे.

Lok Sabha Voting : आजच्या हॉट सीट्स

आजच्या मतदानामध्ये काही ठराविक जागा या भरपूर चर्चेत असणार आहेत.

वायनाड - राहुल गांधींचा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये किती मतदान होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यांच्या विरोधात डाव्या पक्षांनी एनी राजा आणि भाजपने सुरेंद्रन यांना तिकीट दिलं आहे.

कोटा - लोकसभा स्पीकर ओम बिर्ला हे याठिकाणी उभे आहेत. त्यांच्या विरोधात भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले प्रल्हाद गुंजल हे असणार आहेत.

मणिपूर - हिंसाचारामुळे चर्चेत असणाऱ्या आउटर मणिपूर मतदारसंघात देखील आज मतदान पार पडणार आहे.

तिरुवअनंतपुरम - केरळमध्ये आज सर्वच जागांवर मतदान पार पडत आहे. यातील काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर यांच्या तिरुवअनंतपुरम मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

Lok Sabha Voting 2nd Phase : देशात कुठे कुठे मतदान?

महाराष्ट्रासोबतच आज केरळमध्ये सर्व 20 जागांसाठी, कर्नाटकातील 14 जागांसाठी, राजस्थानातील 13 जागांसाठी, यूपीमधील आठ जागांसाठी, मध्य प्रदेशातील सात जागांसाठी, बिहार आणि आसाममधील 5-5 जागांसाठी, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन जागांसाठी तसंच मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील एक-एक जागेसाठी मतदान पार पडेल.

Lok Sabha Election 2024 LIVE : दुसऱ्या टप्प्यासाठी आज ‘मतसंग्राम’; राज्यातील 'या' आठ मतदारसंघांत होणार मतदान

महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत आज 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आठ मतदारसंघांत अटीतटीची लढाई होणार आहे.

राज्यातील मतदान

 • विदर्भ : अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, बुलडाणा

 • मराठवाडा : परभणी, हिंगोली व नांदेड

 • एकूण उमेदवार : २२३

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा आहे. देशातील 13 राज्यांमधील 88 जागांवर आज मतदान पार पडेल. महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत आज 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आठ मतदारसंघांत अटीतटीची लढाई होणार आहे. नांदेड मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तर अकोल्यातून निवडणूक लढत असलेले वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.