BJP Plan For Loksabha: फडणविसांच्या मदतीला आला गोपीनाथ मुंडेंचा स्पेशल फॉर्म्युला,४०+ वर लक्ष

महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुका भाजपसाठी महत्वाच्या
BJP Plan For Loksabha
BJP Plan For Loksabha

Loksabha Election : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर भाजप राजकीय सामाजिक समीकरणे तयार करण्यात गुंतले आहे. गेल्या वर्षभरापासून भाजप विरोधकांवर भारी पडत आहे. भाजप आता चार दशके जुन्या 'माधव' फार्म्युल्याची मदत घेणार आहेत. या फार्म्युल्यामुळे कधीकाळी भाजपने महाराष्ट्रात आपणी मुळे घट्ट रोवली होती. माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपचा हा फॉर्म्युला कमकुवत झाला आहे.

महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुका महत्वाच्या आहेत. आधी लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणुका राज्यात होणार आहेत. यापूर्वी भाजपने दोन मोठे पक्ष फोडले आहेत. दोन्ही पक्षांचे गट आता भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी आता भाजपची अधीकृत टीम आहे.

आता विरोधकांमध्ये काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर स्वत:ला खरा पक्ष असल्याचे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस धडपडत आहेत. महाविकास आघाडी आता कमकुवत झाली आहे. भाजपला देखील हेच हवे होते.

भाजपला विधानसभेपेक्षा लोकसभा निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजप जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. याआधी भाजपने शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) मदतीने 40 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांना मजबूत करण्यासाठी भविष्यातील रणनीती आखत आहे. यामध्ये भाजप पुन्हा एकदा माधव (माळी, धनगर आणि वंजारी) यांच्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

BJP Plan For Loksabha
Manipur Violence : मणिपूरमधील परिस्थितीवर सुरक्षा यंत्रणांची नजर, ६०००हून अधिक तक्रारी दाखल; सरकारी सूत्रांची माहिती

गोपीनाथ मुंडे यांनी 80 दशकात माधव फॉर्म्युल्यावर काम केले. गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे आधीच भाजपमध्ये आहेत तर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे अजित पवार यांच्यासोबत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपचे सामाजीक समीकरणांवर जास्त लक्ष आहे. धनगर समाजासाठी अहिल्याबाई होळकर यांच्याबाबत भाजप खूप सक्रिय आहे.

धनगर समाज अहिल्याबाईंना दैवत मानतो. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करणे आणि बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अहिल्या देवी होळकर यांच्या नावावर करणे यामागेही नवीन राजकीय समीकरण आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा राजकीय प्रचारामध्ये नक्की दिसेल.

महाराष्ट्रात ओबीसी समाजातील माळी, धनगर आणि वंजारी समाजाचे वर्चस्व आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अकोला, परभणी, नांदेड आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांमध्ये या समुदायांचा मोठा प्रभाव आहे. महाराष्ट्रात 40 टक्के ओबीसी समाज आहे.

यामध्ये अनेक जातींचा समावेश आहे. 40 हून अधिक विधानसभा मतदारसंघात त्यांचे निर्णायक मते आहेत आणि सुमारे 100 विधानसभा मतदारसंघांवर या समाजाच्या लोकांचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजप माधव सुत्रावर जास्त लक्ष देत आहे. देवेंद्र फडणीवस राज्यात पक्षाचे नेतृत्व करत आहेत. तेव्हापासून ओबीसी समाजावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. 

ओबीसी समाजाचे छगन भुजबळ सोबत आल्यामुळे भाजपला त्याचा मोठा फायदा होणार आहे. छगन भुजबळ माळी समाजातील मोठे नेतृत्व आहेत. भुजबळांचा हात पकडेल असा कोणताही नेता भाजपमध्ये नाही. आधी गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे हे मोठे नेते होते. यांना ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा होता. मात्र त्यांच्यानंतर भाजपमध्ये कोणी तसा नेता नव्हता. फडणवीसांना देखील ओबीसी समाज आणि भाजपचे गणित जुळवता आले नाही.

BJP Plan For Loksabha
Eknath Shinde: इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांना मोठी मदत, मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार पालकत्व

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com