
प्रार्थनास्थळांवरील आणि इतर ठिकाणी असलेल्या भोंग्यांबाबत राज्य सरकारने नियमावली तयार केली असून संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे. या पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात कुचराई केली तर त्यांच्यावरच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत भोंग्यावरुन विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.