Devendra Fadnavis: वजनदार मंत्र्याचा भार झाला कमी; शिंदे आणि दादांचा दबदबा कायम!
Maharashtra Politics: मंत्रिमंडळात आकाराने भाजप मंत्र्यांचे संख्याबळ अधिक दिसत असले तरी पक्षातील अनेक वजनदार नेत्यांना कमी महत्त्वाच्या खात्यांवर समाधान मानावे लागले आहे.
Mumbai: राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतीक्षित खातेवाटप आज जाहीर झाले. या खातेवाटपात महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपने गृह, सहकार, कृषी, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा आणि ऊर्जा यासारखी वजनदार खाती स्वतःकडे राखत सरकारवरचे वर्चस्व कायम ठेवलेले दिसतं.