

Maharashtra Shines at Davos; Massive Investment to Create 15 Lakh Jobs
Sakal
दावोस: भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच ‘गेटवे’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार दावोस अार्थिक परिषदेच्या पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणुकीबरोबर राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत.