ओंकार हत्तीने दोडामार्ग व सावंतवाडीच्या काही भागात अक्षरशः धुडगूस घातलाय. भरवस्तीत हत्ती येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भात शेती, केळी बागायतीचे अतोनात नुकसान या हत्तीकडून सुरू आहे. यापूर्वी या हत्तीने दोडामार्गमधील एका शेतकऱ्याचा बळी सुद्धा घेतला होता. या ओंकार हत्तीला पकडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर वनताराची टीम दोडामार्गमध्ये दाखल झाली आहे.