Latest Marathi News Live Update
esakal
बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना राजस्थान पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्यावर ३० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. अटकेनंतर दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. उदयपूर इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीचे मालक डॉक्टर अजय मुर्डिया यांची ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. आठवड्याभरापूर्वी विक्रम भट्ट यांच्यासह ६ जणांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती.