Latest Marathi News Live Update
esakal
देवीच्या मिरवणुकीदरम्यान शॉक बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वाघोलीतील उबाळेनगर परिसरात सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. नितीन पवार ( वय २२, रा. उबाळेनगर, वाघोली ) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा आठ महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी देवीची मिरवणूक निघाली होती. तो या मिरवणुकीत सहभागी झाला होता. या दरम्यान ट्रॅक्टर मागे तो होता. त्याला अचानक शॉक बसला. या धक्क्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या कर्नाटक येथील मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.