सांगली : महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेकडून गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन सोमवारी (ता. ८) रात्री उशिरा स्थगित करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह उपमुख्य कार्यकरी अधिकारी, सर्व पंचायत समित्यांमधील गटविकास अधिकारी आज कार्यालयात हजर झाले. मात्र ‘मनरेगा’संदर्भात मागण्यांनुसार शासन निर्णय होईपर्यंत याबाबतचे काम बंद ठेवण्याचे व घरकुलांसह इतर सर्व नियमित कामे सुरू राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.