इचलकरंजीत सांस्कृतीक व सेवाभावी संस्थेच्या नावाखाली सुरु असलेल्या ५२ पत्त्याच्या तीन पानी जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये जुगार खेळणा-या तब्बल ३० जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे यातील आठजणांवर यापूर्वीही जुगाराचे गुन्हे पोलीस दप्तरी नोंद आहेत. या कारवाईत एक लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इचलकरंजीतील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या थोरात चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.