भारतीय सैन्याला ‘विद्युत रक्षक’ या अनोख्या स्वदेशी तंत्रज्ञानासाठी पेटंट प्रदान करण्यात आलं आहे. मेजर राजप्रसाद आर. एस. यांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागांतील विविध वीज प्रणालींचं एकत्रित नियंत्रण आणि देखरेख शक्य होऊन कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.