Latest Marathi News Live Update : कोर्टात सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे बच्चू कडू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी
Breaking Marathi News live Updates 11 December 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात चार ते पाच जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीची किरकोळ धडक बसल्याच्या कारणावरून या टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी तसेच दगडाने दोन जणांना मारहाण केली. या घटनेत दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.