आशिया कपमध्ये अबुधाबीला भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना येत्या रविवारी होणार आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने येत्या रविवारी १४ सप्टेंबरला 'माझं कुंकू-माझा देश' आंदोलन केले जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे? असा सवाल करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.