Latest Marathi News Live Update
esakal
मुंबईत कामानिमित्त आलेल्या जर्मनीचे रहिवासी एबरनाउ रायान यांचा पासपोर्ट, व्हिसा व पाकीट उबेर टॅक्सीत विसरले गेले होते. ही घटना १४ डिसेंबर रोजी रात्री वाकोला परिसरात घडली. मदतीसाठी ते वाकोला पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी तत्काळ टॅक्सीचा शोध घेतला. गाडी क्रमांक MH-02-7858 व चालक संजीवकुमार यादव यांच्याशी संपर्क साधण्यात आला. टॅक्सीतून सर्व कागदपत्रे सुरक्षितरीत्या मिळून ती रायान यांना परत करण्यात आली. पोलिसांच्या तत्पर मदतीबद्दल त्यांनी आभार मानले.