लातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डोंगर पोखरून अवैध उत्खनन सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील, सोनवती भोयरा, आकरवाई, एकुर्गा, यासह इतर भागात सर्रास मुरूम माफियांकडून मुरुम उपसा सुरू आहे.तर महसूल विभागाच्या नाकाखालीच डोंगर फोडून मुरूम व मातीचे सर्रास उत्खनन केले जात असून संपूर्ण परिसरातील जमिनीची ही चाळण झाली आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे तहसीलदार व संबंधित यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.