ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, पडळकर यांचे नाव न घेता, करारा जबाब मिलेगा, असा इशारा सुहास देसाई यांनी दिला.