पुणेः पुण्यातील तीन प्रसिद्ध खासगी रुग्णालयांमध्ये रोज १९ खाटा गरजवंत रुग्णांसाठी उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. पण पुणे महापालिकेकडून या राखीव खाटांबाबत जनजागृती केली जात नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही. गेल्या तीन वर्षात २० हजार ८०५ रुग्णांवर मोफत उपचार होऊ शकले असते, पण केवळ २२७ जणांवरच उपचार झाले आहेत. महापालिकेने याबाबत जनजागृती करून नागरिकांना लाभ दिला पाहिजे, अशी मागणी सजन नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली आहे.